शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
2
बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
3
मुंबईत घरभाड्याचे दर देशात सर्वाधिक; दिल्ली दुसऱ्या क्रमांकावर, ठाण्यात किती भाडेवाढ?
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : अजित पवारांसह अनेकांनी बजावला मतदानाचा हक्क; अनेक ठिकाणी ‘ईव्हीएम’मध्ये बिघाड!
5
A.R.Rahman divorce: "आम्हाला वाटलं होतं ३० वर्ष पूर्ण करू, पण...", ए. आर. रहमानचा २९ वर्षांचा संसार मोडला
6
केवळ शॉपिंग नाही, आता कमाई पण करून देणार 'ही' कंपनी; येणार ₹८००० कोटींचा बहुप्रतीक्षीत IPO
7
मुंबई, ठाण्यात ठाकरे, शिंदेंची प्रतिष्ठा पणाला! ठाकरे बंधूंच्या मतदारसंघांकडे लक्ष
8
पराभव दिसू लागल्यानेच मविआकडून तावडेंवर हल्ला; देवेंद्र फडणवीसांचा आरोप
9
जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार पादेश्वर महाराजांच्या गाडीवर दगडफेक; महाराज जखमी
10
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
11
जगभर : मुजतबा खामेनेई : ‘शांत’ डोक्याचा ‘सुप्रीम लीडर’!
12
Vaibhav Suryavanshi: १३ वर्षांच्या मुलाला उघडेल आयपीएलचं दार?
13
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
14
टक्का वाढला पाहिजे..! सर्वोच्च अधिकार नाकारून कसे चालेल...?
15
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
16
विशेष लेख: ‘अर्बन नक्षल’- भाजपच्या मानगुटीवरचे भूत 
17
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
18
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
19
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
20
वाशिम येथे मतदानास सुरुवात; मतदारांना मिळतेय सहकार्य

रोह्यात ३४२ एकर जमीन लाटण्याचा प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2019 12:23 AM

रोहे तालुक्यातील दिव या गावात गट नं. १३३ मधील १३७ हेक्टर २५ आर म्हणजे सुमारे ३४२ एकर सरकारी खाजण जमीन आहे. गेले चार पिढ्या या जमिनीवर सुमारे ६० कुळे पारंपरिक शेती व्यवसाय करीत आहेत.

अलिबाग : रोहे तालुक्यातील तब्बल ३४२ एकर सरकारी जमीन प्रशासनातील काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना हाताशी धरून दलालांनी घशात घातली होती, मात्र सर्वहारा जन आंदोलनाने वेळीच दलालांचे मनसुबे उघडकीस आणले आणि कोट्यवधी रुपयांचा जमीन घोटाळा बाहेर काढला आहे. प्रशासनाने याची गंभीरपणे दखल घेत सदर व्यवहार रद्द केला आहे, अशी माहिती सर्वहारा जन आंदोलनाच्या नेत्या उल्का महाजन यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली. या जमिनी शेतकऱ्यांच्या नावावर कराव्यात, अशी मागणीही त्यांनी केली.रोहे तालुक्यातील दिव या गावात गट नं. १३३ मधील १३७ हेक्टर २५ आर म्हणजे सुमारे ३४२ एकर सरकारी खाजण जमीन आहे. गेले चार पिढ्या या जमिनीवर सुमारे ६० कुळे पारंपरिक शेती व्यवसाय करीत आहेत. सदरच्या जमिनीवर शेतकºयांनी अतिक्र मण केल्याने त्यांना त्याबाबतचा दंड देखील आकारण्यात आला होता. त्यानंतर शेतकºयांनी दंड भरून ही जमीन शेतकºयांच्या नावावर करण्यात याव्यात. याबाबत येथील शेतकºयांनी तहसील प्रशासन रोहा यांना अर्ज केला होता.याचा फायदा याच गावातील काही दलालांनी घेतला. त्यांनी शेतकºयांना बोलवून जागा नावावर करण्यासाठीचा प्रस्ताव सादर करीत असल्याचे खोटेच सांगितले. त्यानुसार शेतकºयांनी आपापल्या सह्या दलालांनी तयार केलेल्या कागदपत्रांवर केल्याचे उल्का महाजन यांनी सांगितले.दलालांनी त्यानंतर सरकार दरबारी दलालांनी आपले वजन वापरून तब्बल ३४२ एकर जमिनीवर ताबे कब्जा घेण्यासाठी महसूल अधिकाºयांना हाताशी धरून या सर्व जागेवर द. क. खोत यांच्या नावाची नोंद करून घेतली. हा झालेला बदल त्यांनी २६ जानेवारी २०१९ मध्ये जाहीर केला.खोती जमीन जाहीर करण्यापूर्वी दलालांनी तब्बल १४२ कुळांची नावे या सातबारावर दाखल केली होती. प्रत्यक्षात या जमिनीमध्ये कसणाºया शेतकºयांची संख्या ६० आहे. या ६० शेतकºयांना कूळ म्हणून दाखल करून दलालांनी आपल्या ८२ नातेवाइकांची नावे कुळात घुसवली असल्याचा आरोप उल्का महाजन यांनी केला.दलालांनी सरकारी खाजण जमिनीवर कुळांच्या नोंदी १८ फेब्रुवारी २०१९ रोजी केल्या आहेत. कुळांची अखत्यार पत्र दुय्यम निबंधक कार्यालयात २ फेब्रुवारी २०१९ रोजी दाखल केली. आपण केलेली फसवणूक बाहेर पडू नये म्हणून स्थानिक शेतकºयांना कूळ बनवले. तलाठी कार्यालयात असणाºया सातबारावर मार्च आणि एप्रिलमध्ये १३ फेरफारच्या नोंदी केल्या आहेत. लावलेल्या शेतकरी कुळांना दुय्यम निबंधक कार्यालयात आणण्या आगोदर त्यांच्या सह्या घेण्यात आल्या होत्या. ही प्रक्रि या जमीन नावावर होणार असल्याचे खोटे सांगून करण्यात आली होती.- गेले चार पिढ्या या जमिनीवर सुमारे ६० कुळे पारंपरिक शेती करीत आहेत. सदरच्या जमिनीवर शेतकºयांनी अतिक्र मण केल्याने त्यांना त्याबाबतचा दंड देखील आकारण्यात आला होता. त्यानंतर शेतकºयांनी दंड भरून ही जमीन शेतकºयांच्या नावावर करण्यात याव्यात. याबाबत येथील शेतकºयांनी तहसील प्रशासन रोहा यांना अर्ज केला होता.व्यवहार झाल्यावर पैसे शेतकºयांच्या खात्यामध्ये जमा झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. बँकेतून पैसे काढल्यानंतर त्यातील २५ टक्के रक्कम शेतकºयांना दिली. उर्वरित रक्कम दलालांनी शेतकºयांना धमकावून आपल्या खिशात घातल्या आरोप उल्का महाजन यांनी केला.जिल्ह्यात विविध प्रकल्प प्रस्तावित आहेत. शेतकºयांना कवडीमोल दर देऊन त्यांच्या जमिनी खरेदी करण्यासाठी दलालांची धावपळ सुरू आहे. अनेक मोठमोठ्या प्रकल्पांमध्ये फसवणूक करणाºया दलालांची आणि गुंतवणूकदारांची साखळी कार्यरत आहे, असेही महाजन यांनी सांगितले.अतिक्रमण केलेल्या आणि दंड भरलेल्या जमिनी आमच्या नावावर करून देणार असल्याचे दलालांनी सांगितले होते. त्यानुसार आम्ही कागदपत्रांवर सह्या केल्या. त्यानंतर या दलालांनी आम्ही कसत असलेली जमीन गुंतवणूकदारांना विकली. विक्री व्यवहारानंतर आलेली रक्कमही त्यांनी हडप केली. दलाल आणि पंचांवर कारवाई करायला पाहिजे.- रंजना पाटील,महिला शेतकरी, रोहे

टॅग्स :Raigadरायगड