उदो... उदोच्या गजरात देवींना निरोप

By Admin | Published: October 12, 2016 04:51 AM2016-10-12T04:51:52+5:302016-10-12T04:51:52+5:30

जिल्ह्यातील ८३८ देवीच्या मूर्तींचे मंगळवारी विसर्जन करण्यात आले. त्यामध्ये ६८७ सार्वजनिक १५१ खासगी मूर्तींचा समावेश होता. त्याचप्रमाणे १६९ सार्वजनिक

Udo ... Send a message to Goddesses in the garrison of power | उदो... उदोच्या गजरात देवींना निरोप

उदो... उदोच्या गजरात देवींना निरोप

googlenewsNext

अलिबाग : जिल्ह्यातील ८३८ देवीच्या मूर्तींचे मंगळवारी विसर्जन करण्यात आले. त्यामध्ये ६८७ सार्वजनिक १५१ खासगी मूर्तींचा समावेश होता. त्याचप्रमाणे १६९ सार्वजनिक आणि एक हजार २०२ घटांची स्थापना करण्यात आली होती. त्यांचेही विसर्जन करण्यात आले. जिल्ह्यात ठिकठिकाणी मिरवणुका काढण्यात आल्या होत्या. तरु णाईला हवाहवासा वाटणाऱ्या नवरात्रोत्सवाची सांगता मंगळवारी झाली. जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी रावणाच्या प्रतिमेचे दहन
करु न विजयादशमीचा सण साजरा करण्यात आला.
दसऱ्याच्या शुभेच्छा देऊन आनंदाचे सोने जिल्हाभर लुटण्यात आले. गेले नऊ दिवस नवरात्रोत्सवाची धुम सर्वत्र सुरु होती. तरु णांसह अबाल वृध्दही गरबा, दांडीयामध्ये चांगलेच रमून गेले होते. भजन, किर्तन, फॅन्सी ड्रेस, नृत्य स्पर्धा अशा भरगच्च कार्यक्र माची रेलचेल नवरात्रोत्सवात पाहावयास मिळाली. महिलांसाठी पाककला स्पर्धांचेही आयोजन करण्यात आले होते. त्यांना महिलांनी चांगलाच प्रतिसाद दिला होता. अलिबागमधील विविध सार्वजनिक मंडळांनी दांडीया, गरबा नृत्यासाठी पास दिले होते. त्यामुळे कोणालाही थेट प्रवेश देण्यात आलेला नव्हता. महिला, तरु णींच्या सुरक्षेसाठी मंडळांनी हा निर्णय घेतला होता. त्याचे महिलावर्गाने स्वागत केले होते. मंडळांनी खबरदारी घेतल्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. मंगळवारी सायंकाळी देवीच्या मूर्तींची विसर्जन मिरवणूक काढण्यात आली होती. विविध मंडळांनी देवीच्या मूर्तींची मिरवणूक काढण्यासाठी वाहनांवर विद्युत रोषणाई केली होती. आकर्षक देखावेही उभारल्याचे दिसून आले. विसर्जन मिरवणुकीमध्ये गरबा, दांडीयाबरोबरच बॉलीवुड स्टाईलवरील ठेका धरला होते. अलिबागच्या समुद्र किनारी विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी भक्तांनी गर्दी केली होती. खाद्यपदार्थाचे स्टालही खचाखच भरले होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस बंदोबस्त होता. (प्रतिनिधी)

Web Title: Udo ... Send a message to Goddesses in the garrison of power

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.