आगरदांडा : मुरुड तालुक्यातील धनगरवाडी राहणारा जनार्दन शिंदे यांच्याकडे विनापरवाना गावठी बनावटीची ठासणीची एका नळीची बंदूक व ती वापरण्याकरिता लागणारा दारुगोळा असल्याची माहिती मुरुड पोलिसांना समजली. त्यानंतर पोलिसांनी छापा मारून आरोपी जनार्दन शिंदे याला हत्यारासह पकडले.अलिबाग येथील जिल्हा न्यायालय हजर करण्यात आले असता त्या आरोपीस तीन दिवसांची पोलीस कस्टडी देण्यात आली आहे. तालुक्यातील बिनापरवाना शस्त्र वापरण्यावर आमची करडी नजर असून संबंधीतवर कठोर कार्यवाही करण्यात येईल असे पोलीस निरीक्षक दिगंबर सावंत व उपनिरीक्षक सुदेश पालकर यांनी सांगितले. याप्रकरणी मुरुड पोलीस ठाण्याचे निरीक्षक दिगंबर सावंत, उपनिरीक्षक सुदेश पालकर, पोलीस नाईक राहुल मुनेश्वर, निलेश गिरी, वैभव जाधव, अरुण घरत व रविंद्र शेलार यांनी ही कार्यवाही केल्याने मुरुड तालुक्यात खळबळ माजली आहे. अशा प्रकारे बेकायदेशीर शस्त्र वापरून शिकार करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. (वार्ताहर)
विनापरवाना बंदूक वापरणाऱ्यास अटक
By admin | Published: October 19, 2015 1:21 AM