पेण : नगरपरिषदेच्या विषय समिती सभापतीपदासाठी सोमवारी झालेल्या निवडणुकीत विरोधकांना तलवार म्यान करावी लागली. संख्याबळाच्या निकषात प्रत्येक समितीवर सत्ताधारी काँग्रेसचे तीन, तर विरोधकांचे दोन सदस्य नियमात पात्र ठरल्याने विषय समिती सभापतीपदासांठी काँग्रेस उमेदवारांचे अर्ज दाखल झाले. सभापतीपदासाठी प्रत्येकी एकच अर्ज दाखल झाल्याने निवडणूक बिनविरोध होऊन बांधकाम, करशुल्क, स्वच्छता पाणीपुरवठा व महिला बालकल्याणच्या सभापतीपदी काँग्रेसचेच वर्चस्व अबाधित राहिले. मात्र, स्थायी समितीमध्ये विरोधी सदस्य असावा, यावर मतदान घेऊन १२-१० अशा फरकाने काँग्रेसच वरचढ ठरली.बिनविरोध निवड झालेल्या विषय समितीच्या सभापतीपदावर, आरोग्य, पाणीपुरवठा पथदीप समिती अर्थात उपाध्यक्ष व पदसिद्ध सभापती म्हणून दीपक गुरव, तर समितीच्या सदस्यांमध्ये राजेश म्हात्रे, नलिनी पवार काँग्रेस तर वुसधा पाटील व प्रतिभा जाधव नगरविकास आघाडी, बांधकाम व नियोजन समितीच्या सभापतीपदावर सुहास पाटील, तर सदस्यांमध्ये शेहनाज मुजावर, अश्विनी शाह (काँग्रेस), शोमेर पेणकर व राजेंद्र वारकर (नगरविकास आघाडी), कर व शुल्क समिती सभापतीपदी वैशाली कडू, तर सदस्यांमध्ये राजेश म्हात्रे व दर्शना बाफना (काँग्रेस), मंगेश पेडामेकर व सुनीता जोशी (नगरविकास आघाडी), महिला व बालकल्याण सभापतीपदावर तेजस्वीनी नेने, तर सदस्यांमध्ये देवता साकोस्कर, अश्विनी शहा (काँग्रेस), भावना बांधणकर व अर्पिता कुंभारी (नगरविकास आघाडी) असे काँग्रेसचे तीन सदस्य व नगरविकास आघाडीचे दोन सदस्य असल्याने मतदान न होता, विरोधकांना समिती सदस्यत्व मिळण्यावरच समाधान मानावे लागले. महत्त्वाचे म्हणजे स्थायी समितीमध्ये आपला प्रवेश व्हावा, अशी इच्छा असतानाही नव्या नियमांच्या नुसार यांचे अधिकार निवडणूक निर्णय अधिकारी दत्तप्रसाद नडे यांनी पालिका प्रशासनाकडे सोपवले. त्या नियमांच्या अनुषंगाने सत्ताधारी काँग्रेसने विरोधकांना संधीच नको, अशा पावित्र्यात संख्याबळ विरोधकांपेक्षा दोनने जास्त असल्याचा फायदा घेत संधी नाकारली. यावर मतदान झाले. परिणामी १२-१० अशा फरकाने पराभव होऊन स्थायी समितीवर नगराध्यक्षा प्रीतम पाटील, उपनगराध्यक्ष दीपक गुरव, विषय समित्यांचे सभापती व काँग्रेसचे गटनेते अनिरुद्ध पाटील यांची निवड झाली. स्थायी समितीमध्ये एकूण सहा सदस्यांमध्ये सत्ताधारी काँग्रेसचेच वर्चस्व दिसून आले. एकंदर भाजपाच्या नव्या नियम पद्धती व नगराध्यक्षांना दिलेले विशेष अधिकाराच्या अनुषंगाने पेण नगरपरिषदेत भाजपा व शेकाप प्रणीत नगरविकास आघाडीचे १० सदस्य निवडून येऊनही त्यांच्या हाती काहीच लागले नाही. १० विरुद्ध १२ अशी आघाडी असूनही बिनविरोध निवडीचा फॉरमेट त्यांना स्वीकारावा लागला. (वार्ताहर)माथेरानमध्ये नगरपरिषद सभापतींची निवडच्माथेरान : नगरपरिषदेच्या विषय समितींच्या निवडी नगरपरिषद सभागृहात विद्यमान नगराध्यक्षा प्रेरणा सावंत, पीठासीन अधिकारी तथा अधीक्षक संतोष शिंदे, मुख्याधिकारी सागर घोलप यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध विषय समित्यांवर नवनिर्वाचित सदस्यांची निवड करण्यात आली आहे. यातील शिक्षण समिती सभापतीपदी नरेश काळे, आरोग्य सभापती आकाश चौधरी, बांधकाम सभापती शीतल पटेल, नियोजन विकास समिती सभापती प्रियांका कदम यांची निवड झाली.च्महिला बालकल्याण सभापती प्रतिभा घावरे यांची निवड करण्यात आली आहे. या वेळी गटनेते प्रसाद सावंत यांसह अन्य नगरसेवक, नगरसेविका आणि नगरपरिषदेचे लिपिक रत्नदीप प्रधान, प्रवीण सुर्वे, राजेश रांजाणे, स्वीकृत सदस्य चंद्रकांत जाधव, ऋतुजा प्रधान उपस्थित होते. सोमवारी नगरपरिषदेच्या विषय समितींच्या सभापतींच्या निवडीची घोषणा नगरपरिषद सभागृहात नगराध्यक्षा प्रेरणा सावंत, पीठासीन अधिकारी तथा अधीक्षक संतोष शिंदे, मुख्याधिकारी सागर घोलप यांनी के ली.उनपच्या विषय समित्यांवर भाजपाचेच वर्चस्वच्उरण : उरण नगरपरिषदेच्या विविध विषय समितीच्या पदाधिकाऱ्यांची निवड सोमवारी झाली. स्थायी समितीच्या सभापतीपदी पदसिद्ध नगराध्यक्षांची निवड होते. त्यामुळे स्थायी समितीच्या सभापती नगराध्यक्षा सायली म्हात्रे, तर सदस्यपदी जयेंद्र कोळी, गॅस यास्मीन, महम्मद फाईक, रवी भोईर, प्रियांका पाटील, नंदकुमार लांबे, दमयंती म्हात्रे यांची निवड झाली आहे. सार्वजनिक बांधकाम समितीच्या सभापतीपदी उपनगराध्यक्ष जयेंद्र कोळी, तर सदस्यपदी जान्हवी पंडित, मेराज शेख, राजेश ठाकूर, समीर मुकरी यांची निवड झाली आहे.च्स्वच्छता, सार्वजनिक आरोग्य सभापती गॅस यास्मीन महम्मद फाईक यांची, तर सदस्यपदी स्नेहल कासारे, मेराज शेख, धनंजय कडवे, विद्या म्हात्रे, क्रीडा, सांस्कृतिक व शिक्षण मंडळाच्या सभापतीपदी रवी भोईर, तर सदस्यपदी रजनी कोळी, स्नेहल कासारे, राजेश ठाकूर, अतुल ठाकूर च्महिला बालकल्याण समितीच्या सभापतीपदी प्रियांका पाटील, उपसभापतीपदी आशा शेलार, पाणीपुरवठा आणि जलनिस्सारण समितीच्या सभापतीपदी नंदकुमार लांबे, नियोजन व विकास समितीच्या सभापतीपदी दमयंती म्हात्रे यांची निवड झाली असल्याची माहिती उनप कार्यालयात देण्यात आली. महाडमध्ये विषय समित्यांवर काँग्रेसचे वर्चस्व महाड : असलेल्या महाड नगरपरिषदेच्या विषय समित्यांच्या निवडणुकीत काँग्रेसचे सर्व सभापती बिनविरोध विजयी झाले. शिक्षण व नियोजन समितीचे सभापतीपद हे उपनगराध्यक्ष सुनील कविस्कर यांना, तर सार्वजनिक बांधकाम समिती सभापतीपदी गोविंद राक्षे, तर महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी मयुरी शेडगे यांची बिनविरोध निवड झाली. शिक्षण समिती सभापती तथा उपनगराध्यक्ष सुनील कविस्कर, सदस्य सुषमा यादव, हमीदा शेखनाग, सपना बुटाला, शुभांगी शेडगे, सार्वजनिक बांधकाम सभापती संदीप जाधव, सदस्य प्रमोद महाडिक, प्रशांत म्हामुणकर, सुनील आगरवाल. सार्वजनिक आरोग्य समिती सभापती वजीर कोंडीवकर, सदस्य सुषमा यादव, विद्या साळी, भाग्यश्री फुटाणकर, चेतन पोटफोडे, पाणीपुरवठा समिती सभापती गोविंद राक्षे, सदस्य प्रमोद महाडिक, भाग्यश्री फुटाणकर, रश्मी बाईत, दीपक सावंत, महिला बालकल्याण समिती सभापती मयुरी शेडगे, सदस्या रश्मी बाईत, हमीदा शेखनाग, सुचेता मेहता यांची निवड झाली.
विषय समित्यांची बिनविरोध निवड
By admin | Published: January 10, 2017 6:13 AM