लोकमत न्यूज नेटवर्कधाटाव : रोह्यात पावसाचा जोर कायम राहिल्याने धाटाव औद्योगिक वसाहतीअंतर्गत रस्ते सध्या पाण्याखाली गेले आहेत. पाण्याचा निचरा व्यविस्थत होत नसल्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाल्याचे दिसून येत आहे. मात्र, मोठमोठ्या खड्ड्यांंनी भरलेल्या रस्त्यावरून वाट शोधताना कामगारांना कसरत करावी लागली. तर सकाळी कामावर हजर राहण्यास उशीर झाल्यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली.रोह्यात रात्रभर कोसळणाऱ्या पावसामुळे डोंगरदऱ्यातील पाणी आता सखल भागात घुसले आहे. कुंडलिका नदीनेही पाण्याची पातळी ओलांडल्यामुळे रोह्यासह धाटाव औद्योगिक वसाहतीअंतर्गत रस्त्यांवरसुद्धा पाणी साचल्यामुळे वसाहतीतील रस्ते मात्र पाण्याखाली आल्याचे पाहावयास मिळाले. सांडपाणी प्रक्रि या केंद्रात चेंबरवाटे जाणारे रासायनिक सांडपाणीसुद्धा या पाण्यात मिसळल्यामुळे लाल, हिरव्या, पिवळ्या व निळ्या रंगाचे पाणीसुद्धा काही ठिकाणी पाहावयास मिळाले. या पाण्यामुळे कामगारांना सकाळी कामावर जाताना रस्ता शोधताना चांगलीच कसरत करून उशिरा हजर राहवे लागले, तर रस्त्यावरील पथदिवे बंद अवस्थेत असल्याने रात्री अंधारातून मार्ग शोधावा लागला.
धाटाव औद्योगिक वसाहतीअंतर्गत रस्ते पाण्याखाली
By admin | Published: June 30, 2017 2:56 AM