वावोशी : फिक्स डिपॉझिटच्या नावाखाली वीस हजार रुपये उकळून फरारी झालेल्या वायपी कॅपिटल इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या तीन संचालकांविरोधात फसवणुकीची तक्रार खालापूर पोलीस ठाण्यात दाखल झाल्यामुळे खळबळ उडाली. खालापूर गावात राहणारे सुरेश शंकर दिसले (५५) यांच्या घरी २०१४ मध्ये वायपी कॅपिटल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे संचालक यश हाके, विजय आहिरे व राजेंद्र भट आले होते. या तिघांनी सुरेश दिसले यांना वीस हजार रुपये फिक्स डिपॉझिटमध्ये टाकल्यास वर्षभरात २८ हजार रुपये परत मिळतील, असे आमिष दाखिवले होते. दिसले यांनी वीस हजार रुपयांची गुंतवणूक वायपी कॅपिटल इंडिया प्रायव्हेट लिमिटेडमध्ये केली. फिक्स डिपॉझिटची मुदत उलटून गेल्यानंतर सुरेश दिसले यांनी पैसे परत मिळण्यासाठी संपर्क साधला; परंतु त्यांना उडवाउडवीची उत्तरे मिळाली. गुंतवणूक केलेली रक्कम तरी मिळावी यासाठी सुरेश दिसले यांनी पाठपुरावा केला; परंतु त्यांची निराशा झाली. फसवणूक झाल्याचे सुरेश दिसले यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलीस ठाणे गाठत यश हाके, विजय आहिरे व राजेंद्र भटविरोधाततक्र ार दिली आहे. पोलिसांनी वायपी कॅपिटल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या संचालकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखेचे पोसई स्वामी करीत आहेत. (वार्ताहर)
खालापुरात गुंतवणुकीच्या नावाखाली वीस हजारांचा गंडा
By admin | Published: March 25, 2017 1:32 AM