आरटीईअंतर्गत जिल्ह्यात १,५२५ बालकांना प्रवेश
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2019 11:51 PM2019-05-29T23:51:15+5:302019-05-29T23:52:23+5:30
आरटीई २०१९-२० प्रवेश प्रक्रियेअंतर्गत रायगड जिल्ह्यातील आरटीई २५ टक्के पात्र २५४ शाळांतील ३ हजार ९४३ उपलब्ध जागांकरिता एकूण ६ हजार २८३ ऑनलाइन अर्ज प्राप्त झाले होते.
अलिबाग : शिक्षण हक्क कायदा अर्थात आरटीई २०१९-२० प्रवेश प्रक्रियेअंतर्गत रायगड जिल्ह्यातील आरटीई २५ टक्के पात्र २५४ शाळांतील ३ हजार ९४३ उपलब्ध जागांकरिता एकूण ६ हजार २८३ ऑनलाइन अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी ८ एप्रिल रोजी काढण्यात आलेल्या पहिल्या सोडतीत (लॉटरी) २ हजार १७१ विद्यार्थी प्रवेश पात्र ठरले असून त्यापैकी १ हजार ५२५ विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रवेश दिल्याची माहिती रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी शैलजा दराडे यांनी दिली आहे. ऑनलाइन अर्ज भरताना काही त्रुटी राहिल्याने पालकांना त्या त्रुटी दूर करता येणार आहेत. या दुरुस्तीची मुदत ४ जून २०१९ पर्यंत आहे. पालकांना अर्ज दुरुस्तीसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.