जंजिरा किल्ल्यावर गाइडची व्यवस्था पूर्ववत; पर्यटक समाधानी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2019 10:34 PM2019-10-30T22:34:10+5:302019-10-30T22:34:50+5:30
प्रवासी संघटना आक्रमक झाल्याने घेतला निर्णय
आगरदांडा : ऐतिहासिक जंजिरा किल्ल्यावर पर्यटक येण्यास सुरुवात झाली आहे. हा किल्ला पाहण्यासाठी महाराष्ट्रातील विविध भागांतून सुमारे साडेपाच लाख पर्यटक येथे येत असतात. चार ही बाजूला समुद्र व खारट पाणी असतानादेखील या किल्ल्यात दोन गोड्या पाण्याचे तलाव असल्याने येथे कधी ही पाणीटंचाई भासत नाही. या किल्ल्याचे पर्यटकांना खूप आकर्षण असल्याने येथे दरवर्षी लाखो पर्यटक येत असतात. या किल्ल्यावरील काही दिवसांपासून गाइेड व्यवस्था बंद करण्यात आली होती. त्यामुळे पर्यटकांना किल्याविषयी माहिती मिळत नव्हती. याबाबत प्रवासी संघटनेने आक्रमक भूमिका घेतल्याने पुन्हा गाइडची व्यवस्था करण्यात आली आहे. यामुळे पर्यटकांनी समाधान व्यक्त के ले आहे.
गाइड बंद केल्यामुळे स्थानिकांना रोजगार मिळणे बंद झाले होते, त्यामुळे पुरातत्व विभागाबद्दल स्थानिक नागरिकांचासुद्धा रोष वाढला होता. जंजिरा किल्ल्यावरील गाइेड व्यवस्था बंद केल्याचे समजताच मुरुड तालुका प्रवासी संघटना आक्रमक होऊन संघटनेचे अध्यक्ष श्रीकांत सुर्वे यांनी काही नागरिकांसह थेट जंजिरा किल्ला गाठून याबाबत किल्ल्यावर असणारे परिचारक प्रकाश गोगरे यांना विचारणा केली. गाइड व्यवस्था बंद केल्याने स्थानिक नागरिकांचा रोजगार बुडाला आहे, तरी पुन्हा गाइड पर्यटकांना उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी केली. त्याच वेळी येथे असणाऱ्या पर्यटकांनीसुद्धा आम्हाला गाइड आवश्यक असल्याची मागणी उचलून धरली. ज्याला आवश्यक वाटेल, तो गाइडचा उपयोग करेल, परंतु आम्हाला किल्ल्याचा इतिहास जाणून घ्यावयाचा असतानासुद्धा गाइड नसल्याने आमचा हिरमोड होत असल्याची प्रतिक्रिया अनेक पर्यटकांनी गोगरे यांच्याकडे व्यक्त केली. यावर गोगरे यांनी येथे असणारे गाइड पर्यटकांकडून मोठी रक्कम आकारात होते, याबाबत अनेक तक्रारी प्राप्त झाल्याने ही गाइड व्यवस्था बंद करण्यात आली होती, परंतु पर्यटक व प्रवाशी संघटनेने मागणी केली, म्हणून आम्ही ही व्यवस्था पूर्ववत करीत आहोत, असे सांगितले. गाइडबाबत तक्रार पुन्हा होता कामा नये, अशी अपेक्षा यावेळी त्यानेही व्यक्त केली.
यावेळी मुंबई येथील प्रफुल दवे आणि पुण्यातील आनंद करवा व इतर पर्यटक किल्ला पाहण्यासाठी आले असता जंजिरा किल्ल्यात गाइड सेवा चांगल्या प्रमाणे सेवा देत आहेत, परंतु ती सेवा मराठीत असावी जेणेकरून ती माहिती येथील येणाºया पर्यटकांना कळेल, तसेच गाइड सेवकांनी या किल्लाचा संपूर्ण इतिहास सांगितला पाहिजे, अशी अपेक्षा पर्यटकांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.