५०० कुटुंबांवर बेकारीची कुऱ्हाड

By admin | Published: October 19, 2015 01:26 AM2015-10-19T01:26:42+5:302015-10-19T01:26:42+5:30

मांडवा बंदर येथे खाजगी करणातून सुरु करण्यात येणाऱ्या कुल कार सेवेमुळे स्थानिकांचा रोजगार बुडून सुमारे ५०० कुटुंबांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळणार आहे.

Unemployed Kurchad to 500 families | ५०० कुटुंबांवर बेकारीची कुऱ्हाड

५०० कुटुंबांवर बेकारीची कुऱ्हाड

Next

आविष्कार देसाई, अलिबाग
मांडवा बंदर येथे खाजगी करणातून सुरु करण्यात येणाऱ्या कुल कार सेवेमुळे स्थानिकांचा रोजगार बुडून सुमारे ५०० कुटुंबांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळणार आहे. स्थानिकांवर अन्याय करणाऱ्या सरकार विरोधात दंड थोपटल्या शिवाय पर्याय नसल्याने रस्त्यावर उतरण्याची तयारी केली आहे, अशी माहिती मांडवा बंदर बचाव संर्घष समितीचे अध्यक्ष दिलीप भोईर यांनी लोकमतशी बोलताना दिली.
रविवारी या खाजगी सेवेचा शुभारंभ होणार होता. मात्र तो होऊ शकला नाही. यासाठी मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त तैनात करावा लागणे ही आमचा रोजगार बुडविणाऱ्यांची हार असल्याचे भोईर यांनी सांगितले. ग्रामिण भागाला देशाच्या आर्थिक राजधानीला जोडण्याचे महत्वपूर्ण काम मांडवा बंदर करते. याच परिसरात बलाढ्य उद्योजक, सेलिब्रिटज् यांचे अलिशान बंगले आहेत.अलिबाग सारख्या छोट्या शहराचे अर्थकारण बदलण्यास मांडवा आणि रेवस बंदराचा मोठा वाटा आहे.
मुंबईतून समुद्र मार्गे अलिबागला येणाऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून मांडवा बंदराचे नव्याने विस्तारीकरण करण्यात आल्यानंतर यामध्ये वेगाने वाढ होत आहे. रेवस बंदरमार्गे येणाऱ्यांचे प्रमाणही अधिक आहे.
अलिबाग, नागाव, आक्षी, किहीम, मुरुड, दिवेआगर, श्रीवर्धन येथील पर्यटन स्थळांना भेटी देण्यासाठी येणारे पर्यटक समुद्रमार्गेच अलिबागला येणे पसंत करतात. अलिबागमधून इतर पर्यटन स्थळांकडे जाण्यासाठी चांगली कन्केटीव्हीटी असल्याने हा मार्ग सुखकर आणि जलद म्हणून ओळखला जातो.
गेल्या २० वर्षापासून विक्रम-मिनीडोर रिक्षा बाहेरुन येणाऱ्या पर्यटकांच्या सेवेसाठी येथे हजर असतात. मांडवा आणि रेवस परिसरामध्ये सुमारे ५०० विक्रम-मिनीडोर चालक मालक आहेत.
पर्यटन व्यवसायात वाढ होण्यासाठी पर्यटकांना जास्तीत जास्त उच्च दर्जांच्या सेवा देणे गरजेचे आहे. यासाठी मेरीटाईम बोर्डाने निवादा मागवून खाजगी करणातून मांडवा बंदरावर येणाऱ्यांसाठी कुलकार सेवा देण्याचे ठरविले आहे. लि बिल्स कन्व्हेनियन्ट हॉटेल्स् अ‍ॅण्ड रिसॉर्ट लि.ही सेवा सुरु करणार असल्याने स्थानिक विक्रीम-मिनीडोर रिक्षा चालक-मालकांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळणार आहे. रोजगार हरपल्याने कुटुंबावर उपासमारीची वेळ येणार असल्याने आम्हाला रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय नसल्याचे मांडवा बंदर बचाव संर्घष समितीचे अध्यक्ष दिलीप भोईर यांनी सांगितले.
>> स्थानिकांसाठी शेवटपर्यंत संघर्ष करणार असल्याचे मांडवा बंदर बचाव संघर्ष समितीचे अध्यक्ष दिलीप भोईर म्हणाले. याबाबत मेरीटाईम बोर्डाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही. स्थानिकांच्या प्रश्नावर शेकाप, काँग्रेस, शिवसेना, आम आदमी पार्टीने आंदोलनाला पाठींबा दर्शविला असल्याचेही भोईर यांनी सांगितले. स्थानिकांचा रोजगार बुडणार नाही यांची काळजी सरकारने घेणे गरजेचे आहे. निविदा काढताना परस्पर निविदा काढण्यात आल्याची तक्रार जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांच्याकडे केली आहे. मात्र, प्रशासन आणि सरकारी पातळीवर मागण्यांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे भोईर यांनी स्पष्ट केले.

Web Title: Unemployed Kurchad to 500 families

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.