रायगड : केंद्रीय मंत्री आणि शिवसेना नेते अनंत गीते यांच्या गाडीचा पालीजवळ अपघात शुक्रवारी झाला. या अपघातात अनंत गीते किरकोळ जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार,अनंत गीते हे खोपोलीकडून पालीकडे जात होते. त्यावेळी पालीजवळ हा अपघात झाला. त्यांच्या वाहनासमोरील पोलिसांच्या पायलट गाडीसमोर दुचाकीस्वार आडवा आला. त्यामुळे पोलिसांच्या गाडीने अचानक ब्रेक दाबला. त्यामुळे मागे असलेल्या गिते यांच्या गाडीने समोरील पायलट व्हॅनला धडक दिली. त्यानंतर त्यांच्या गाडीच्या मागे असलेल्या दुसऱ्या एका पायलट व्हॅनने त्यांच्या गाडीला धडक दिली.
या घटनेत अनंत गीते यांच्या डोक्याला किरकोळ जखम झाली असून त्यांना जवळच्याच रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अनंत गिते हे रायगडमधील शिवसेनेचे खासदार आहेत.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून अनंत गीते यांची फोनवरून विचारपूस गीते यांच्या गाडीला आज अपघात झाल्याची बातमी वा-यासारखी पसरली आणि त्यांना दुखापत झाली असेही काही प्रसारमाध्यमांकडून सांगण्यात आले. मात्र गीते सुखरूप असून ते पुढील प्रवासाला निघाले आहेत अशी माहिती रायगडचे एसपी अनिल पारस्कर यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे, झालेल्या अपघाताबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांनी अनंत गीते यांची दूरध्वनीद्वारे चौकशी केली असून त्यांना काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे.