केंद्रीय अन्नधान्य आणि विकास राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांचे लाभार्थ्यांना मार्गदर्शन, लाभार्थ्यांशी साधला संवाद

By राजेश भोस्तेकर | Published: August 23, 2022 03:24 PM2022-08-23T15:24:08+5:302022-08-23T15:24:18+5:30

Raigad News: अलिबाग जिल्ह्यातील  महाड तालुक्यात केंद्रीय अन्नधान्य व विकास राज्य मंत्री.  भारत प्रल्हाद सिंह पटेल यांचा आज दिनांक २२ ऑगस्ट रोजी दौरा सुरू झाला आहे.

Union Minister of State for Foodgrains and Development Pralhad Singh Patel guided the beneficiaries, interacted with the beneficiaries | केंद्रीय अन्नधान्य आणि विकास राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांचे लाभार्थ्यांना मार्गदर्शन, लाभार्थ्यांशी साधला संवाद

केंद्रीय अन्नधान्य आणि विकास राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांचे लाभार्थ्यांना मार्गदर्शन, लाभार्थ्यांशी साधला संवाद

googlenewsNext

- राजेश भोस्तेकर
अलिबाग -  जिल्ह्यातील  महाड तालुक्यात केंद्रीय अन्नधान्य व विकास राज्य मंत्री.  भारत प्रल्हाद सिंह पटेल यांचा आज दिनांक २२ ऑगस्ट रोजी दौरा सुरू झाला आहे. किल्ले रायगडवर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. यावेळी जगदीश्वर मंदिरात जाऊन महादेवाचे दर्शन घेतले. त्यानंतर महाड येथील राष्ट्रीय स्मारक येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.  

रायगड लोकसभा प्रवास योजना  या कार्यक्रमा अंतर्गत केंद्रीय अन्नधान्य व विकास राज्य मंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांनी पंतप्रधान आवास योजना, उज्ज्वला योजना, किसान विमा योजना इत्यादी अनेक योजनेचा लाभ घेतलेल्या आदिवासी बंधू भगिनी, व इतर लाभार्थ्यांना मिळालेल्या सुविधा, त्यांना येत असलेल्या अडचणी, काही तक्रार असल्यास त्याबद्दल काही शंका असल्यास त्याचे निवारण मंत्री महोदय यांच्यामार्फत करण्यात आले.
 तसेच त्यांनी या योजना राबविण्यात काही त्रुटी असल्यास त्याबद्दल लाभार्थ्यांना विचारणा केली.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मते शेवटच्या टोकाला आलेल्या नागरिकाला लाभ मिळाला पाहिजे. कोणतीही योजना राबविताना एखाद्या लाभार्थ्यांचे कागदपत्र घेतले असतील तर दुसऱ्या एखाद्या योजनेचा लाभ घेताना त्या लाभार्थ्याला  पुन्हा पुन्हा तेच कागदपत्रे मागितली जात आहेत, ते थांबले पाहिजे. राज्य सरकारने केंद्र सरकारच्या योजना यशस्वीरित्या राबविणे गरजेचे आहे. त्यासाठी तळागाळातील नागरिकांच्या दारोदारी वेगवेगळ्या योजनांची माहिती मिळेल याची व्यवस्था करून ती त्या गावातील अत्यंत गरजू व्यक्तीला किंवा कुटुंबाला त्या त्या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे यासाठी सर्व यंत्रणांनी कार्य केले पाहिजे. अशा सूचना मंत्री महोदयांनी अधिकाऱ्यांना केल्या आहेत.

तुमच्या अडचणी वेळोवेळी संबंधित समन्वयकाकडे दिल्यास, त्यामुळे यंत्रणा योग्यरीतीने कार्यान्वित करता येईल.असे यावेळी केंद्रीय अन्नधान्य व विकास राज्य मंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांनी सांगितले. त्यानंतर जनसंघ व विचार परिवार समन्वय सदस्यांशी बैठक घेत त्यांना मार्गदर्शन केले.

Web Title: Union Minister of State for Foodgrains and Development Pralhad Singh Patel guided the beneficiaries, interacted with the beneficiaries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Raigadरायगड