पनवेलमध्ये सभापतींचे अनोखे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2017 02:59 AM2017-11-07T02:59:33+5:302017-11-07T02:59:41+5:30
पनवेल महानगरपालिकेतील सत्ताधाºयांनी वेगवेगळ्या मुद्द्यांवरून प्रशासनाला टार्गेट करण्याचे धोरण अवलंबले आहे. स्वच्छतादूत म्हणून भाऊ कदम यांची निवड करताना विश्वासात घेतले नाही
कळंबोली : पनवेल महानगरपालिकेतील सत्ताधाºयांनी वेगवेगळ्या मुद्द्यांवरून प्रशासनाला टार्गेट करण्याचे धोरण अवलंबले आहे. स्वच्छतादूत म्हणून भाऊ कदम यांची निवड करताना विश्वासात घेतले नाही. त्याचबरोबर सभापतींना बसण्याकरिता केबिन नाही, असा मुद्दा त्यांनी उपस्थित केला आणि महापालिकेच्या नवीन इमारतीच्या जमिनीवर बसून ठिय्या आंदोलन केले. मात्र प्रशासनाने संदर्भासहित स्पष्टीकरण देत सर्व आरोप खोडून काढल्याने आंदोलनाची हवाच निघून गेली.
पनवेल महानगरपालिका नव्याने निर्माण झाली असल्याने काम करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अपुरी जागा ही सुध्दा मोठी अडचण ठरू लागली आहे. नवीन प्रशासकीय इमारतीत पदाधिकाºयांना बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. नवीन सात केबिन तयार असून उर्वरित तीन सभापतींना उपायुक्त, सहायक आयुक्त आणि लेखाधिकाºयांची केबिन खाली करून देण्याची तयारी दर्शवली आहे.
निवडणुकीच्या प्रक्रि येत मोठ्या प्रमाणात कालावधी खर्च पडला त्याचबरोबर मोठे काम असल्याने त्याकरिता मर्यादा आली, म्हणून केबिनच्या कामाला काही प्रमाणात विलंब लागला. परंतु त्याकरिता कमीत कमी सहा महिन्याची मुदत आवश्यक असल्याचा मुद्दा उपायुक्त जमीर लेंगरेकर यांनी उपस्थित केला. मात्र सत्ताधारी पक्षाच्या सभापतींनी सोमवारी नवीन इमारतीच्या तळमजल्यावर ठिय्या मांडला.त्यामध्ये प्रकाश बिनेदार, विद्या गायकवाड, दर्शना भोईर. डॉ. अरुण भगत, अॅड. मनोज भुजबळ, विकास घरत यांचा समावेश होता. सभापतींची निवड होवून एक महिना उलटला तरी दालन मिळाले नसल्याचे प्रकाश बिनेदार यांनी सांगितले. आम्हाला प्रशासन विश्वासात घेत नसल्याचा आरोप त्यांनी केला.
महापालिका आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे, उपायुक्त जमीर लेंगरेकर, संध्या बावनकुळे, शहर अभियंता संजय कटेकर, डॉ. भगवान खाडे यांनी सभापतींना वरती येण्याची विनंती केली. त्याचबरोबर नवीन चार आणि अधिकाºयांची तीन अशी दालने उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव दिला.
उपायुक्त संध्या बावनकुळे यांनी मिटिंग हॉलमध्ये बसून आपले कामकाज करण्याची तयारी दर्शवली. परंतु आम्हाला आश्वासन देवूनही नवीन दालने का उपलब्ध करून
दिली नाहीत हा मुद्दा सभापतींनी लावून धरला. सर्व नगरसेवक माऊंटअबू या ठिकाणी अभ्यास दौºयावर चालले असल्याने आता तूर्तास तरी दालनाबाबत अशी भूमिका घ्यायला नको होती, ही खंत लेंगरेकर आणि बावनकुळे यांनी व्यक्त केली.