‘देशात सध्या मनुस्मृतीचेच अघोषित राज्य’ - आनंदराज आंबेडकर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2018 04:04 AM2018-12-26T04:04:49+5:302018-12-26T04:05:09+5:30

समाजातील विषमतेची दरी दूर व्हावी यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २५ डिसेंबर १९२७ रोजी मनुस्मृती दहन करून महिलांना गुलामगिरीच्या जोखडातून मुक्त केले.

'An unmuted State of Manu Smriti right now' - Anandraj Ambedkar | ‘देशात सध्या मनुस्मृतीचेच अघोषित राज्य’ - आनंदराज आंबेडकर

‘देशात सध्या मनुस्मृतीचेच अघोषित राज्य’ - आनंदराज आंबेडकर

googlenewsNext

महाड : समाजातील विषमतेची दरी दूर व्हावी यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २५ डिसेंबर १९२७ रोजी मनुस्मृती दहन करून महिलांना गुलामगिरीच्या जोखडातून मुक्त केले. मात्र आजही आपल्या देशात अघोषित मनुस्मृतीचेच राज्य असल्याची टीका करीत या राज्यकर्त्यांचे मनसुबे वेळीच धुळीस मिळवा, अन्यथा देशात पुन्हा गुलामगिरीचे राज्य येईल अशा शब्दांत बौद्धजन पंचायत समितीचे सभापती आनंदराज आंबेडकर यांनी राज्यकर्त्यांवर आसूड ओढले.
महाडमध्ये मनुस्मृती दहनाच्या ९१ व्या वर्धापन दिनी महाडच्या क्रांतीभूमीवर बौद्धजन पंचायत समितीच्या वतीने आयोजित केलेल्या जाहीर सभेत आनंदराज आंबेडकर बोलत होते. ते पुढे म्हणाले की, सध्याचे राज्यकर्ते घटनाविरोधी आहेत, त्यांनी जगात सर्वश्रेष्ठ समजली जाणारी आपली राज्यघटना बदलण्याची भाषा करू नये, असा इशाराही आंबेडकर यांनी यावेळी दिला.
यावेळी संघराज रूपवते, विनोद मोरे, एच. आर. पवार, सी. डी. जाधव, अंकुश सकपाळ, गजानन तांबे यांचीही भाषणे झाली. डॉ. प्रमिला संपत, अलका शिंदे, सपना रामटेके यांंचीही भाषणे झाली. यावेळी क्रांतीस्तंभासमोर मनुस्मृतीचे दहन करण्यात आले.
यानिमित्ताने चवदार तळे, क्रांतीभूमी व राष्ट्रीय स्मारकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अनेक मान्यवरांसह राज्यातील विविध भागातून आलेल्या हजारो महिलांनी अभिवादन
केले.

Web Title: 'An unmuted State of Manu Smriti right now' - Anandraj Ambedkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Raigadरायगड