बोर्ली-मांडला : भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने जंजिरा किल्ल्यावर विनापरवाना गाइडचे काम करणाऱ्या स्थानिक रहिवाशांना बंदी घातली आहे. या किल्ल्यावर विनापरवाना गाइडमुळे पर्यटकांची लूट होत असे. मात्र, आता ही लुटालूट आठ दिवसांपासून थांबली आहे; परंतु गाइड नसल्याने पर्यटकांना माहितीशिवाय निराश होऊन परत जावे लागत आहे, तर या बंदमुळे स्थानिक २५ कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे.मुरुड-जंजिरा किल्ला पाहण्यासाठी येणाºया पर्यटकांची लुटालूट सुरू होती. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने विनापरवाना गाइडचे काम करणाºया स्थानिक रहिवाशांना बंदी घालून गाइडकडून होणारी लुटालूट तूर्तास तरी थांबवली आहे, असे म्हणावे लागेल; परंतु या बंदीमुळे २५ कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. आत किमान आठ दिवसांपासून पुरातत्त्व विभागाने बंदी घातल्यामुळे उपासमारीच्या संकटाला सामोरे जावे लागत आहे.जंजिरा पर्यटक सहकारी संस्थेच्या वतीने पुरातत्त्व विभाग व पर्यटन विकास महामंडळाकडे गाइडचे परवाने मिळावेत व पूर्वीप्रमाणे पर्यटकांना सेवा देण्यासाठी निवेदन दिले आहे. संदर्भात भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या अधीक्षक यादव यांनी जंजिरा किल्ल्यावर विनापरवाना गाइडचे काम करत असलेले स्थानिक रहिवासी पर्यटकांकडून २०० रुपये उकळत आहेत. त्याचबरोबर गाइडचे परवाने नसल्याने आम्ही बंदी घातली असल्याचे सांगितले.
जंजिरा किल्ल्यावर विनापरवाना गाइडला बंदी, स्थानिकांच्या २५ कुटुंबांवर उपासमारीची वेळ
By ऑनलाइन लोकमत | Published: March 04, 2020 12:29 AM