नेरळ : कर्जत तालुक्यातील डिकसळ येथे औषधविक्रीचा कोणताही परवाना न घेता खुलेआम औषधविक्री करणाऱ्या येथील डॉक्टर संतोष सदावर्ते यांच्या जनाई नर्सिंग होमवर रायगड जिल्हा अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने नेरळ पोलिसांच्या मदतीने कारवाई के ली. या वेळी४५ हजारांचा माल जप्त केला आहे.डिकसळ येथील जिल्हा परिषदेच्या शाळेसमोर जनाई नर्सिंग होम नावाचा दवाखाना आहे. बाजूच्या गाळ्यात कोणताही औषधविक्रीचा परवाना न घेता बिनदिक्कत विक्री सुरू होती. एफडीएचे अधिकारी मनजीत सिंग राजपाल, मनवार तासखेडकर यांनी सापळा रचून ही कारवाई केली. जप्त साठ्यात विविध प्रकारची इंजिने, वेदनाशामक औषधे, विविध अन्टिबायोटिक्स, यांचा समावेश आहे. औषध व सौंदर्य प्रसाधने कायदा १९४० कलम १८ क व नियामातील शेड्युल ‘के ’नुसार डॉक्टरांना दुकान थाटून औषधविक्र ी करता येत नाही. (वार्ताहर)
विनापरवाना औषधविक्री; डॉक्टरला पकडले
By admin | Published: February 21, 2017 3:50 AM