अवेळी पावसाने पांढरा कांदा धोक्यात; काढलेला कांदा वाचविण्यासाठी शेतकऱ्याची धडपड

By राजेश भोस्तेकर | Published: March 7, 2023 10:49 AM2023-03-07T10:49:22+5:302023-03-07T10:49:36+5:30

शेतातून काढलेला पांढरा कांदा शेतात सुकविण्यासाठी ठेवलेला असल्याने सुरू झालेल्या पावसाने धोक्यात आला आहे.

Unseasonal rain threatens white onion; Farmer's struggle to save in raigad | अवेळी पावसाने पांढरा कांदा धोक्यात; काढलेला कांदा वाचविण्यासाठी शेतकऱ्याची धडपड

अवेळी पावसाने पांढरा कांदा धोक्यात; काढलेला कांदा वाचविण्यासाठी शेतकऱ्याची धडपड

googlenewsNext

लोकमत न्युज नेटवर्क

अलिबाग : अलिबागचा गुणकारी आणि औषधी असलेल्या पांढरा कांद्याचे यंदा चांगले उत्पन्न आले असताना होळीला सुरू झालेल्या अवेळी पावसाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढवली आहे. शेतातून काढलेला पांढरा कांदा शेतात सुकविण्यासाठी ठेवलेला असल्याने सुरू झालेल्या पावसाने धोक्यात आला आहे. पावसामुळे वाचण्यासाठी शेतकऱ्याची कांदा प्लास्टिकने झाकून ठेवण्यासाठी धडपड सुरू झाली आहे. पाऊस मोठ्या प्रमाणात पडल्यास काढलेला तसेच शेतात असलेला कांदा पीक वाया जाण्याचे संकट शेतकऱ्या समोर उभे ठाकले आहे. 

रायगड जिल्ह्यात सोमवारी ६ मार्च रोजी रात्रीच्या सुमारास होळीला अवेळी पावसाचे आगमन झाले. मंगळवारी धुळीवंदन दिवशी पावसाचे वातावरण निर्माण झाले आहे. अलिबाग तालुक्यातील नेहूली, कार्ले, वाडगाव, वेश्र्वी, खंडाळे, धोलपाडा, रुळे या भागात पांढरा कांदा पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून पांढरा कांदा बाजारात विक्रीस आला आहे. तर अद्याप काही कांदा शेतात आहे. शेतकऱ्यांनी काढलेला कांदा हा शेतात सुकविण्यासाठी ठेवलेला आहे. सुकल्या नंतर त्याच्या माळा तयार करून तो विक्रीस पाठविला जात असतो.

जिल्ह्यात सोमवारपासून अवेळी पावसाने सुरुवात केल्याने कांदा उत्पादक यांची शेतात सुकविण्यासाठी काढून ठेवलेला भिजण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा कांदा पावसापासून वाचावा यासाठी शेतकरी त्यावर प्लास्टिक टाकण्यात दंग झाले आहेत. शेतात उभा असलेला कांदाही पावसाने धोक्यात आला आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत सापडला आहे. 

चार दिवसांपूर्वी शेतातून कांदा काढला आहे. तो सुकविण्यासाठी ठेवला आहे. मात्र पावसामुळे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली असल्याने तो झाकून ठेवत आहोत. कोकणातील शेतकऱ्याचे नुकसान झाले तर शासन लक्ष देत नाही. मात्र घाट माथ्यावर त्वरित दखल घेऊन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देतात. आम्हालाही नुकसान भरपाई मिळावी ही शासनाकडे विनंती.

- दयानंद पाटील, कांदा उत्पादक

Web Title: Unseasonal rain threatens white onion; Farmer's struggle to save in raigad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.