दोन नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द

By admin | Published: November 23, 2015 01:27 AM2015-11-23T01:27:15+5:302015-11-23T01:27:15+5:30

माथेरान नगर परिषदेतील दोन नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द करण्याचे आदेश रायगडच्या जिल्हाधिकारी शीतल तेली-उगले यांनी दिले.

Unsubscribe from two corporators | दोन नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द

दोन नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द

Next

अलिबाग : माथेरान नगर परिषदेतील दोन नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द करण्याचे आदेश रायगडच्या जिल्हाधिकारी शीतल तेली-उगले यांनी दिले. अनधिकृत बांधकाम केल्या प्रकरणी एका तक्रार अर्जाबाबत हा महत्त्वपूर्ण निकाल शनिवारी देण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसला हा फार मोठा धक्का असल्याचे बोलले जाते. जिल्हा प्रशासनाच्या या निर्णयामुळे कायदा धाब्यावर बसविणाऱ्यांसाठी ही फार मोठी चपराक आहे.
दिलीप शामलाल गुप्ता आणि त्यांच्या पत्नी विनीता दिलीप गुप्ता अशी त्या नगरसेवकांची नावे आहेत. माथेरान नगर परिषदेची निवडणूक डिसेंबर २०११ ला पार पडली होती. राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय आणि शिवसेना या तीन पक्षांनी विकास आघाडीच्या माध्यमातून ही निवडणूक लढविली होती. प्रशासनाला सादर करावयाच्या प्रतिज्ञापत्रामध्ये दिलीप गुप्ता आणि विनीता गुप्ता यांनी खोटी माहिती देत प्रशासनाची दिशाभूल केल्याची तक्रार माथेरानच्या आशा कदम यांनी जिल्हाधिकारी रायगड यांना दिली होती. दिलीप गुप्ता यांचा दगडी कोळसा आणि लखनवी रेडिमेड कपड्यांचा व्यवसाय आहे. त्याचप्रमाणे नेरळ ग्रामपंचायतीमध्ये ७०६/ब-१,७०६/ब-२ आणि ७०६/ब-३ अशा मिळकती आहे. यांचा उल्लेख प्रतिज्ञापत्रात केला नसल्याचे तक्रारदाराने अर्जात नमूद केले होते. माथेरान बाजारपेठेमध्ये गुप्ता यांचे नरिमन चिक्की मार्ट नावाचे दुकान आहे. त्या दुकानाच्या इमारतीवर अनधिकृत पक्के बांधकाम केले आहे. माथेरान हे पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र जाहीर केलेले आहे. तळमजला अधिक एक मजला या व्यतिरिक्त कोणत्याही बांधकामाला परवानगी नाही, मात्र गुप्ता यांनी कायदे धाब्यावर बसवित दुसऱ्या मजल्याचे बांधकाम केले. या प्रकरणी माथेरान नगर परिषदेने गुप्ता यांना अनधिकृत बांधकामाबाबत नोटीसही पाठविली होती. त्याबाबतची सुनावणी जिल्हाधिकारी यांच्याकडे सुरु होती. जिल्हाधिकारी शीतल तेली-उगले यांनी शनिवारी याबाबतचा महत्वपूर्ण निकाल दिला.
जिल्हा प्रशासनाच्या या निकालामुळे विकास आघाडीला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला फार मोठा धक्का बसला आहे.(प्रतिनिधी)

Web Title: Unsubscribe from two corporators

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.