राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी उरण नगरी सजली 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2024 06:54 PM2024-01-21T18:54:06+5:302024-01-21T18:54:23+5:30

अयोध्येत सोमवारी राममंदिरात होणाऱ्या राममुर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्या निमित्ताने उरण परिसरातही उत्साहाचे वातावरण पसरले आहे.

Uran city was decorated for the dedication ceremony of Ram temple | राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी उरण नगरी सजली 

राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी उरण नगरी सजली 

मधुकर ठाकूर 

उरण: अयोध्येत सोमवारी राममंदिरात होणाऱ्या राममुर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्या निमित्ताने उरण परिसरातही उत्साहाचे वातावरण पसरले आहे. परिसरातील रामभक्तांनी उरण नगरी ठिकठिकाणी सजावट केली आहे. रस्ते स्वच्छ केले आहेत.रस्तोरस्ती सडा रांगोळ्या काढल्या आहेत. मंदिरांवर रोषणाई करण्यात आली आहे. उरण शहरातील राममंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. उरण परिसरातील अनेक रस्ते राममंदिर, रामाची छवी असलेल्या भगवे झेंडे, पताकांनी सजविण्यात आले आहेत. दुचाकी, रिक्षा, चारचाकी, सायकल इतर वाहने झेंडे, पताकांनी सजविण्यात आली आहेत. 

सर्वत्रच रामनामाचा जयघोष सुरू असुन उरण नगरी झेंडे,पताका, रांगोळीने सजली आहे. सोमवारी (२२) महेश बालदी मित्र मंडळाच्या वतीने १० वाजता रामाची राममंदिर, गणपती चौक अशी शोभायात्रा काढण्यात येणार आहे.१२ वाजता या शोभायात्रेची सांगता करण्यात येणार आहे. तर १ ते ३ दरम्यान महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे. अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे थेट प्रक्षेपण  नागरिकांना पाहण्यासाठी भव्य एलएडी स्क्रीनची व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती मंडळाचे आयोजक कौशिक शहा यांनी दिली.

Web Title: Uran city was decorated for the dedication ceremony of Ram temple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.