रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनने आयोजित १९ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेत उरण क्रिकेट स्पोर्ट असोसिएशन विजेता

By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2023 05:42 PM2023-04-03T17:42:07+5:302023-04-03T17:42:20+5:30

रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशन तर्फे घेण्यात आलेल्या १९ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट संघाच्या निवड स्पर्धेत उरण येथील उरण क्रिकेट स्पोर्ट असोसिएशन संघ विजेता ठरला.

Uran Cricket Sport Association Winner of Under 19 Boys Cricket Tournament organized by Raigad District Cricket Association | रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनने आयोजित १९ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेत उरण क्रिकेट स्पोर्ट असोसिएशन विजेता

रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनने आयोजित १९ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेत उरण क्रिकेट स्पोर्ट असोसिएशन विजेता

googlenewsNext

मधुकर ठाकूर, उरण :

रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशन तर्फे घेण्यात आलेल्या १९ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट संघाच्या निवड स्पर्धेत उरण येथील उरण क्रिकेट स्पोर्ट असोसिएशन संघ विजेता ठरला. अंतिम सामन्यात त्यानी एसबीसी महाड संघाचा पराभव केला. अत्यंत अटीतटीच्या आणि शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या या सामन्यात उरण संघाने महाड संघाचा एका गडी राखून पराभव केला. उरण क्रिकेट असोसिएशनचा खेळाडू दक्ष भगत हा या स्पर्धेत मालिकावीर ठरला.  त्याने संपूर्ण स्पर्धेत २१ बळी घेतले.

या स्पर्धेत रायगड जिल्ह्यातील एकूण १८ संघानी भाग घेतला होता. १ फेब्रुवारीपासून लेदर बॉल वर ४० षटकांची ही लिग पद्धतीची स्पर्धा सूरू होती. रविवारी २ एप्रिल रोजी या स्पर्धेचा अंतिम सामना झाला. अंतिम सामन्यात पियुष वाथ आणि सुरज शिरसाट हे दोघे सामनावीर ठरले. या स्पर्धेचे बक्षिस वितरण रायगड जिल्हा क्रिकेट असोशिएशनचे उपाध्यक्ष प्रकाश पावसकर, किरीट पाटील, रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे निवड समितीचे अध्यक्ष प्रितम कैया आणि कोऑर्डिनेटर सुहास हिरवे यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी प्रशांत माने, सुरेश पटेल, सचिन म्हात्रे हे उपस्थित होते.

Web Title: Uran Cricket Sport Association Winner of Under 19 Boys Cricket Tournament organized by Raigad District Cricket Association

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.