मधुकर ठाकूर, उरण : उरण-पनवेल मार्गावरील सुरू करण्यात आलेल्या दोन्ही नादुरुस्त मोऱ्या दूरुस्तीच्या कामासाठी महिन्याभराहुन अधिक काळावधी लागणार असल्याने नेरुळ-उरणचा रेल्वे प्रवासी वाहतूकीला येत्या जुन नंतरचाच मुहूर्त सापडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
उरण-पनवेल मार्गावरील नादुरुस्त मोऱ्यांच्या दुरुस्तीसाठी शनिवार (१३) पासून बोकडवीरा पोलीस चौकी ते उरण रेल्वे स्थानक दरम्यानचा रस्ता एक किमी पर्यंत मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. त्यामुळे नव्याने निर्माण होत असलेल्या उरण स्थानकाचा मार्ग बंद झाला आहे.त्यामुळे नागरिक, प्रवासी, वाहनांना उरण शहरातून व शहरा बाहेरच्या रस्त्याचा वापर करावा लागत असल्याने प्रवाशांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. नादुरुस्त मोऱ्यांच्या दुरुस्तीसाठी मार्ग बंदी आणि पर्यायी मार्गाची अधिसूचना नवी मुंबई वाहतूक विभागाने जाहीर केली असल्याने या कामाला सुरुवात झाली आहे. सध्या उरण रेल्वे स्टेशन जवळील मोरी तोडून त्याचे काम सुरू करण्यात आले आहे.त्यामुळे उरण स्थानकाकडे येजा करण्याचा मार्ग बंद झाला आहे. परिणामी उरण-नेरुळ मार्गावरुन जुनं अखेर पर्यंत प्रवासी वाहतूक सुरू होण्याची शक्यता धूसर झाली आहे.
उरण-पनवेल मार्गावरील बोकडवीरा पोलीस चौकी ते उरण रेल्वे स्टेशन हा मार्ग बंद करण्यात आला आहे. मोऱ्याचे काम पूर्ण होईपर्यंत बंद राहणार आहे.त्यासाठी पर्यायी त्यामुळे उरण शहरात ये जा करणाऱ्या प्रवाशांनी बोकडवीरा उड्डाणपूल मार्गे नवीन शेवा ते चारफाटा असा प्रवास करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.मोऱ्या दुरुस्तीचे काम १५ जुन महिन्यापर्यंत होणार असल्याची माहिती उरण सांबां.विभागाचे उप अभियंता नरेश पवार यांनी दिली. मात्र सध्या उरण कोटनाका ते जुना रेल्वे रस्ता ते नवीमुंबई एसईझेड कंपाऊंड मार्गाने बोकडवीरा पेट्रोल पंप या मार्गाने वाहतूक सुरू आहे.