विजेचा लपंडावामुळे उरणकरांचा संताप
By admin | Published: June 9, 2015 10:34 PM2015-06-09T22:34:28+5:302015-06-09T22:34:28+5:30
पहिल्याच पावसाच्या दणक्याने महावितरणच्या मान्सूनपूर्व कारभार उघडकीस आला आहे. वीजेच्या लपंडाव आणि विद्युत वितरण विभागाच्या अनागोंदी कारभाराची भर पडल्याने उरणची जनता पार त्रस्त झाली आहे.
उरण : पहिल्याच पावसाच्या दणक्याने महावितरणच्या मान्सूनपूर्व कारभार उघडकीस आला आहे. वीजेच्या लपंडाव आणि विद्युत वितरण विभागाच्या अनागोंदी कारभाराची भर पडल्याने उरणची जनता पार त्रस्त झाली आहे.
विद्युत ट्रान्स्फॉर्ममध्ये दोष निर्माण झाल्याने विजेअभावी दोन दिवसांपासून अंधाराचा सामना करणाऱ्या उरण शहरातील काही भागांतील नागरिकांनी सोमवारी सबस्टेशन दोन तास बंद पाडले. ट्रान्स्फार्मर बसविल्याशिवाय इतर विभागाचाही विजपुरवठा बंद करावा, अशी मागणी करीत सबस्टेशनमधील सामानाची नासधूस करुन संताप व्यक्त केला. नागरिकांच्या संतापामुळे उरण एमएसईबी सबस्टेशनमधील कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली.
उरण परिसरात सध्या महावितरण कंपनीचा अनागोंदी कारभार सुरु आहे. महावितरण विभागाच्या सावळागोंधळामुळे केव्हाही कधीही कुठल्याही ठिकाणची कितीही काळ अचानक वीज गुल होऊ लागली आहे. उरण विभागातील ग्रामीण भागातील काही गावांत तर दोन-दोन दिवस वीज गायब असते. चार दिवसांपासून महावितरणच्या कर्मचाऱ्यांना तांत्रिक दोषच सापडला नसल्याची माहिती नागरिकांनी दिली. (वार्ताहर)