उरणची रक्षणकर्ती उरणावती देवी; जागृत देवस्थानानं मोघल सैनिकांना पळवलं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2023 04:02 PM2023-10-21T16:02:38+5:302023-10-21T16:02:52+5:30

१३ व्या शतकातील बिंबा राजाच्या काळातील हे अतिशय प्राचीन देवीचे मंदिर आहे.पुर्वी या ठिकाणी घनदाट जंगल होते.

Uranavati is an ancient goddess famous in Uran Panchkroshi | उरणची रक्षणकर्ती उरणावती देवी; जागृत देवस्थानानं मोघल सैनिकांना पळवलं

उरणची रक्षणकर्ती उरणावती देवी; जागृत देवस्थानानं मोघल सैनिकांना पळवलं

मधुकर ठाकूर

उरण : उरण शहरात देवीची काही मंदिरे आहेत. यामध्ये जरीमरी देवीचा समावेश असला तरी उरणावती, शितळादेवी, गावदेवी अशी तीन नावे धारण केलेली एकच देवी देऊळवाडीत विराजमान आहे. तीन नावाने येथील पंचक्रोशीत प्रसिद्ध असलेली पुरातन कालीन देवी म्हणजे उरणावती होय.याच देवीच्या नावावरूनच उरणला उरण नाव पडले आहे. उरण शहरातील देऊळवाडी येथील उरणावती, शितलादेवी, गावदेवी तीन नावाने ओळखल्या जाणाऱ्या उरणावती देवीचे एक पुरातन मंदिर आहे.

१३ व्या शतकातील बिंबा राजाच्या काळातील हे अतिशय प्राचीन देवीचे मंदिर आहे.पुर्वी या ठिकाणी घनदाट जंगल होते.याच घनदाट जंगलात विसावलेल्या उरणावती देवीची इसवी सन १५४२ स्थापना करण्यात आली असल्याचे जुन्या जाणकारांकडून सांगितले जात असले तरी देवीच्या स्थापनेबाबत कोणाकडेही अद्यापही ठोस माहिती उपलब्ध नाही. या देऊळवाडीच्या भुमीत शंकराचे संगमेश्वर,श्री दत्त मंदिर, बालाजी मंदिर, विठ्ठल -रखुमाई आणि उरणावती देवी अशी मंदिरे आहेत.एकाच ठिकाणी असलेल्या पाच मंदिरामुळे या परिसराला देऊळवाडी हे नाव पडले आहे.एकाच ठिकाणी असलेल्या या पाचही देवांच्या मंदिरातील वास्तव्यामुळे ही भुमी पवित्र, मंगलमय बनली आहे.याच पवित्र ठिकाणी उरणावती देवी मंदिरात विराजमान झालेली आहे.

अतिशय प्राचीन उरणावती देवीच्या नावावरूनच उरण नाव पडले असल्याचे सांगितले जात आहे.जागृत देवीच्या अस्तित्वामुळे उरणची रक्षणकर्ती, दंगेधोपे, रोगराई पासून दूर ठेवणारी देवी म्हणून येथील पंचक्रोशीत प्रसिद्ध पावली आहे. मोगल काळात देऊळ
नष्ट करण्याचे प्रयत्न झाले.मात्र देवीच्या कृपेने मंदिरातील उठलेल्या आग्या माशांच्या हल्ल्याने मंदिर नष्ट करण्यासाठी आलेल्या मोगल सैनिकांना पिटाळून लावले. दैवी दयेनच मंदिर वाचले असल्याचे जाणकारांकडून सांगितले जात आहे. या देवीच्या मंदिरासमोरच पाषाणी दिपमाळा आहे. दर वर्षी चैत्र महिन्यातील पौर्णिमेला उरणावती देवींचा उत्सव असतो.या उत्सवासाठी भाविक मोठ्या संख्येने येतात आणि दर्शनाबरोबरच यात्रेचाही आनंद लुटतात.

Web Title: Uranavati is an ancient goddess famous in Uran Panchkroshi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.