शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-चीन सीमेवर दाेन्ही सैन्य माघारीस सुरुवात; २८-२९ ऑक्टाेबरपर्यंत प्रक्रिया हाेणार पूर्ण!
2
आजचे राशीभविष्य: ३ राशींना अनुकूल, आर्थिक लाभ संभवतात; सुखाचा, शांततेचा दिवस
3
घोळ संपेना! मविआचा नवा फॉर्म्युला, तिघांना प्रत्येकी ९० जागा; १८ जागा मित्र पक्षांना
4
मस्का की मस्करी? जगाला ऊठसूट लोकशाही मूल्यांचा डोस देणाऱ्या अमेरिकेत चाललंय काय?
5
मिलिंद देवरा यांना शिंदेसेनेकडून उमेदवारी? वरळीतून आदित्य ठाकरेंच्या विरोधात रिंगणात
6
विशेष लेख: वाट्टेल ते करून लग्न करा, मूल जन्माला घाला! जन्मदर वाढविण्यासाठी नवीन टूम!
7
भ्रष्टाचार निर्मूलन: संवेदनशील सत्यनिष्ठा हवी! काम लवकर होण्यासाठी 'किड' वाढवू नका!
8
ठाण्यात मनसे-महायुती छुपी युती? ठाणे, कल्याण, डोंबिवलीत निवडणूक लढण्याची शक्यता धूसर
9
१३८ कोटींचे सोने पकडले; विशेष चारचाकी वाहनावर पुण्यात कारवाई; कायदेशीर प्रक्रिया सुरू
10
भाजप, शिंदेसेनेच्या तीव्र विरोधामुळे नवाब मलिक यांना अद्याप तरी उमेदवारी नाहीच!
11
विधानसभा निवडणूक: पोलिसांच्या नाकाबंदीत खालापूर टोल नाक्यावर दहा कोटींची चांदी जप्त
12
३६ जागांवर महायुती अन् मविआचेही ‘वेट अँड वॉच’; एकमेकांच्या उमेदवारांची प्रतीक्षा
13
राजकारणातील सर्वच पुतण्यांचा DNA एकसारखाच, अडचणीत आणाल तर...- छगन भुजबळ
14
राहुल नार्वेकरांच्या मालमत्तेत चार कोटींची वाढ; पाच वर्षात आशिष शेलारांची संपत्तीत किती वाढली?
15
रांगोळीवरही निवडणुकीचा रंग! पालघरमधील सफाळेत मतदान जनजागृतीचे अनोखे आवाहन
16
जयश्री थोरातांवर बोलताना भाजपा नेत्याची जीभ घसरली; संगमनेरमध्ये तणाव, वाहनांची तोडफोड
17
तुला नाउमेद करणार नाही; उद्धव ठाकरेंचा नाराज सुधीर साळवींना शब्द, शिवडीतील बंड थंड
18
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर, पाहा कुणाला संधी?
19
काँग्रेसला कमी जागा मिळाल्याने राहुल गांधी नाराज; नाना पटोलेंनी सांगितले बैठकीत काय झालं?
20
इन आँखो की मस्ती में... बॉलिवूड गाजवणाऱ्या मराठमोळ्या मृणाल ठाकूरचं 'रॉयल' फोटोशूट (Photos)

उरणची रक्षणकर्ती उरणावती देवी; जागृत देवस्थानानं मोघल सैनिकांना पळवलं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2023 4:02 PM

१३ व्या शतकातील बिंबा राजाच्या काळातील हे अतिशय प्राचीन देवीचे मंदिर आहे.पुर्वी या ठिकाणी घनदाट जंगल होते.

मधुकर ठाकूर

उरण : उरण शहरात देवीची काही मंदिरे आहेत. यामध्ये जरीमरी देवीचा समावेश असला तरी उरणावती, शितळादेवी, गावदेवी अशी तीन नावे धारण केलेली एकच देवी देऊळवाडीत विराजमान आहे. तीन नावाने येथील पंचक्रोशीत प्रसिद्ध असलेली पुरातन कालीन देवी म्हणजे उरणावती होय.याच देवीच्या नावावरूनच उरणला उरण नाव पडले आहे. उरण शहरातील देऊळवाडी येथील उरणावती, शितलादेवी, गावदेवी तीन नावाने ओळखल्या जाणाऱ्या उरणावती देवीचे एक पुरातन मंदिर आहे.

१३ व्या शतकातील बिंबा राजाच्या काळातील हे अतिशय प्राचीन देवीचे मंदिर आहे.पुर्वी या ठिकाणी घनदाट जंगल होते.याच घनदाट जंगलात विसावलेल्या उरणावती देवीची इसवी सन १५४२ स्थापना करण्यात आली असल्याचे जुन्या जाणकारांकडून सांगितले जात असले तरी देवीच्या स्थापनेबाबत कोणाकडेही अद्यापही ठोस माहिती उपलब्ध नाही. या देऊळवाडीच्या भुमीत शंकराचे संगमेश्वर,श्री दत्त मंदिर, बालाजी मंदिर, विठ्ठल -रखुमाई आणि उरणावती देवी अशी मंदिरे आहेत.एकाच ठिकाणी असलेल्या पाच मंदिरामुळे या परिसराला देऊळवाडी हे नाव पडले आहे.एकाच ठिकाणी असलेल्या या पाचही देवांच्या मंदिरातील वास्तव्यामुळे ही भुमी पवित्र, मंगलमय बनली आहे.याच पवित्र ठिकाणी उरणावती देवी मंदिरात विराजमान झालेली आहे.

अतिशय प्राचीन उरणावती देवीच्या नावावरूनच उरण नाव पडले असल्याचे सांगितले जात आहे.जागृत देवीच्या अस्तित्वामुळे उरणची रक्षणकर्ती, दंगेधोपे, रोगराई पासून दूर ठेवणारी देवी म्हणून येथील पंचक्रोशीत प्रसिद्ध पावली आहे. मोगल काळात देऊळनष्ट करण्याचे प्रयत्न झाले.मात्र देवीच्या कृपेने मंदिरातील उठलेल्या आग्या माशांच्या हल्ल्याने मंदिर नष्ट करण्यासाठी आलेल्या मोगल सैनिकांना पिटाळून लावले. दैवी दयेनच मंदिर वाचले असल्याचे जाणकारांकडून सांगितले जात आहे. या देवीच्या मंदिरासमोरच पाषाणी दिपमाळा आहे. दर वर्षी चैत्र महिन्यातील पौर्णिमेला उरणावती देवींचा उत्सव असतो.या उत्सवासाठी भाविक मोठ्या संख्येने येतात आणि दर्शनाबरोबरच यात्रेचाही आनंद लुटतात.

टॅग्स :Navratriनवरात्री