उरण : पावसाळा सुरू झाला की तरुणाईला वेध लागतात ते वर्षासहलीचे. परिसरात असणारे धबधबे, धरणे, बीच आदी स्थळांना पावसाळ्यात पसंती दिली जाते. रायगड जिल्ह्यातील पर्यटनस्थळांवर जिल्हाधिकाऱ्यांनी बंदी घातली आहे. त्यामुळे वर्षा सहलीसाठी आता मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि लगतच्या भागातील पर्यटकांनी आपला मोर्चा उरण परिसरातील आक्कादेवी, पुनाडे, रानसई आदी धरणे आणि नेहमीच आकर्षित करणाºया पीरवाडी बीचकडे वळविला आहे. त्यामुळे सुट्टी आणि वर्षा सहलीचा आनंद लुटणाºया तरुणाईची उरणच्या पर्यटन ठिकाणी गर्दी वाढू लागली आहे. सध्या रानसई, पुनाडे आदी धरणे ओसंडून वाहू लागली आहेत.>पीरवाडी बीच बनला सेल्फी पॉइंटमुंबईपासून हाकेच्या अंतरावर उरण शहर वसलेले आहे. द्रोणागिरीच्या पायथ्याशी असलेला पीरवाडी बीच पर्यटकांना आकर्षित करीत आहे. बीचवरून दिसणारा समुद्र आणि उधाणाच्या लाटांचे दृश्य कॅमेºयात चित्रित करण्यासाठी पर्यटकांमध्ये चढाओढ लागली आहे. त्यामुळे पीरवाडी बीच आता सेल्फी पॉइंट म्हणूनही आता उदयास येऊ लागला आहे. पीरवाडी बीचबरोबरच द्रोणागिरी किल्ल्यावरही पर्यटकांची गर्दी होत आहे.>रानसई, पुनाडे, आक्कादेवी धरणांचेही आकर्षणउरण परिसरात पावसाची सध्या धुवाधार बॅटिंग सुरू आहे. मुसळधार पावसामुळे नेहमीच पर्यटकांना साद घालीत आलेले चिरनेर परिसरातील आक्कादेवी धरणही भरले आहे. या ठिकाणी मोठ्या संख्येने पर्यटक दाखल होत आहेत. याशिवाय ऐतिहासिक चिरनेर सत्याग्रहातील ठिकाण म्हणूनच आक्कादेवीच्या माळरानाकडे पर्यटक येत असून रविवारी पर्यटक मोठ्या संख्येने या ठिकाणी दाखल झाले होते.
वर्षासहलीसाठी उरणच्या पीरवाडी बीचला पसंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2018 2:59 AM