उरणचा वीजनिर्मिती प्रकल्पच गॅसवर; अपुऱ्या वायूपुरवठ्यामुळे सहापैकी चार संच बंद 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2022 09:54 AM2022-05-12T09:54:55+5:302022-05-12T09:55:06+5:30

जर्मन तंत्रज्ञानाच्या आधारावर १९८५ मध्ये उरणचा वायू विद्युत प्रकल्प उभारला आहे. सहा संचातून ६७२ मेगावॅट वीजनिर्मितीसाठी ३.५ दशलक्ष क्युबिक मीटर गॅसची आवश्यकता आहे.

Uran's power plant on gas; Four out of six sets closed due to insufficient gas supply | उरणचा वीजनिर्मिती प्रकल्पच गॅसवर; अपुऱ्या वायूपुरवठ्यामुळे सहापैकी चार संच बंद 

उरणचा वीजनिर्मिती प्रकल्पच गॅसवर; अपुऱ्या वायूपुरवठ्यामुळे सहापैकी चार संच बंद 

Next

- मधुकर ठाकूर
लोकमत न्यूज नेटवर्क
उरण : ऐन उन्हाळ्यात वाढत्या पाऱ्यामुळे नागरिकांची घामाने भिजून काहिली होत असताना वीजटंचाईचे चटके सामान्यांना सोसावे लागत आहेत. उरणच्या बोकडविरा  ग्रामपंचायतींच्या हद्दीत असलेल्या महाराष्ट्र राज्य वीजनिर्मिती कंपनीच्या विद्युत केंद्राला (जीटीपीएस) गेल्या अनेक वर्षांपासून पुरेशा प्रमाणात गॅसपुरवठाच होत नाही. त्यामुळे प्रकल्पातील सहापैकी चार विद्युतनिर्मिती संच बंदच ठेवावे लागत असल्याने ६७२ मेगावॅट वीजनिर्मितीच्या प्रकल्पाची क्षमता निम्म्याहून अधिक घटली आहे. या घटलेल्या वीज निर्मितीमुळे राज्यातील वीज तुटवड्यात आणखीनच भर पडली आहे.

जर्मन तंत्रज्ञानाच्या आधारावर १९८५ मध्ये उरणचा वायू विद्युत प्रकल्प उभारला आहे. सहा संचातून ६७२ मेगावॅट वीजनिर्मितीसाठी ३.५ दशलक्ष क्युबिक मीटर गॅसची आवश्यकता आहे. मात्र, सुरुवातीपासूनच केवळ २.६ ते २.८ क्युबिक मीटर या सरासरीनुसारच गॅसचा पुरवठा होत होता. त्यानंतर मागील काही वर्षांपासून वीजनिर्मितीच्या दोन संचासाठी २.५ दररोज क्युबिक मीटर गॅसची आवश्यकता आहे. मात्र, फक्त सरासरी १.०५ क्युबिक मीटर गॅसचा पुरवठा गेल कंपनीकडून होत आहे. मागील काही वर्षांपासून आवश्यकतेनुसार गॅसपुरवठा होत नसल्याने सहापैकी चार संच बंद पडले आहेत. त्यामुळे ६७२ मेगावॅट वीजनिर्मिती प्रकल्पातून आता दररोज २५० ते ३०० मेगावॅट इतकीच वीजनिर्मिती होत आहे.       

वीजनिर्मितीचे संच सातत्याने बंद ठेवावे लागत असल्याने कोट्यवधी खर्चून उभारलेले हे संच भंगारात 
जाऊन नादुरुस्त होण्याच्या मार्गावर आहेत. या केंद्राचे विस्तारीकरण करण्याची योजनाही आखली होती. यामुळे प्रकल्पाची क्षमता वाढून १२२० मेगावॅटपर्यंत पोहचणार होती. 
मात्र १२२०  वीजनिर्मितीच्या या प्रकल्पाच्या विस्ताराचा प्रश्नही 
गॅसच्या कमतरतेमुळे प्रलंबित राहिला आहे.

केंद्र, ओएनजीसी ठरवते धोरण
वीजनिर्मिती प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालविण्यासाठी  शंभर टक्के गॅसपुरवठा झाल्यास सध्याची प्रकल्पाची क्षमतेप्रमाणे ६०० मेगावॅटची वीजनिर्मिती करणे फारसे अवघड नाही. मात्र, गॅसचा किती प्रमाणात पुरवठा करावा याबाबतचे धोरण केंद्र सरकार आणि ओएनजीसी व गेल या कंपन्यांच्या माध्यमातून ठरत असल्याने त्यांनी ठरवून दिल्याप्रमाणेच प्रकल्पाला सध्या गॅसपुरवठा केला जातो. त्यामुळे अपुऱ्या गॅस पुरवठ्यामुळेच वीजनिर्मिती कमी प्रमाणात होत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. 

१.०५ इतकाच गॅस पुरवठा
गेल कंपनीकडून आवश्यकतेनुसार जीटीपीएसला याआधीही कधीही गॅसपुरवठा झालेला नाही. त्यामुळे ६७२ मेगावॉट वीजनिर्मितीचे सहापैकी चार संच याआधीच बंद पडले आहेत. उर्वरित सुरू असलेल्या वीजनिर्मितीच्या दोन संचासाठी आवश्यक असणाऱ्या २.५ क्युबिक मीटरऐवजी फक्त १.०५ इतकाच गॅस पुरवठा होत आहे. त्यामुळे वीजनिर्मिती केंद्राची क्षमता २५०-३०० मेगावॅटपर्यंत घसरली आहे. त्यामुळे  या प्रकल्पाच्या विस्ताराचा प्रश्नही गॅसच्या कमतरतेमुळे प्रलंबित राहिला असल्याची माहिती जीटीपीएसचे जनसंपर्क अधिकारी महेश आफळे यांनी दिली.

Web Title: Uran's power plant on gas; Four out of six sets closed due to insufficient gas supply

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :electricityवीज