सहा तालुक्यांमध्ये १९,२८१ घरांमध्ये वैयक्तिक शौचालये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2017 02:00 AM2017-10-03T02:00:53+5:302017-10-03T02:00:56+5:30
रायगड जिल्ह्यातील सहा तालुक्यांमध्ये स्वदेश फाउंडेशनच्या वतीने आजपर्यंत १९,२८१ घरांमध्ये वैयक्तिक शौचालये व १०१ माध्यमिक शाळांमध्ये शौचालयांचे बांधकाम करण्यात आले.
उदय कळस
म्हसळा : रायगड जिल्ह्यातील सहा तालुक्यांमध्ये स्वदेश फाउंडेशनच्या वतीने आजपर्यंत १९,२८१ घरांमध्ये वैयक्तिक शौचालये व १०१ माध्यमिक शाळांमध्ये शौचालयांचे बांधकाम करण्यात आले. यामुळे स्वच्छ भारत अभियानात महाड, पोलादपूर, माणगाव, तळा, म्हसळा, श्रीवर्धन हे तालुके हागणदारीमुक्त बनवण्यासाठी ‘स्वदेश’चे विशेष योगदान आहे.
स्वदेश फाउंडेशनचे विश्वस्त रॉनी स्क्रूवाला व झरिना स्क्रूवाला यांनी स्वच्छ भारत अभियान सुरू होण्यापूर्वीच ग्रामस्थांची गरज ओळखून २००३पासून घरांमध्ये वैयक्तिक शौचालये बांधण्याचा
उपक्रम सुरू केला. ग्रामस्थांना शौचालयाचे महत्त्व पटवून देण्यासाठी स्वदेशचे ३३० सामाजिक कार्यकर्ते, स्वरक्षामित्र यांनी ३६० ग्रामपंचायतींमध्ये प्रबोधन केले, यासाठी शालेय विद्यार्थ्यांची मोलाची मदत झाली. मुलांनी स्वदेशच्या मदतीने शौचालय बांधण्यासाठी पालकांना व ग्रामस्थांना तयार केले. शासनाने निर्मल भारत व स्वच्छ भारत अभियान सुरू केल्यावर शौचालय बांधण्याच्या मोहिमेमध्ये जिल्हा परिषद रायगडच्या स्वच्छ भारत मिशन कक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, सहा तालुक्यांचे गटविकास अधिकारी सर्व ग्रामसेवकांनी स्वदेशच्या मदतीने गावोगावी बैठका घेतल्या व शौचालय बांधण्यासाठी मोहीम हाती घेतली. सहा तालुक्यांमध्ये प्रबोधनासाठी स्वच्छता रथ तयार करून स्वच्छता रथावर तयार शौचालयाचे मॉडेल दाखवण्यात आले. याला चांगला प्रतिसाद मिळाला.
१स्वदेश फाउंडेशन बांधून देत असलेल्या शौचालयाची किंमत २४००० रु पये आहे. लोकवर्गणी प्रत्येक कुटुंब ५००० रु पये घेण्यात येते.
२कुटुंबप्रमुख जर विधवा, निराधार असेल, कुटुंब आदिवासी असेल तर ५०० रु पये वर्गणी घेण्यात येते.
३शासनाच्या यादीमध्ये नोंद नसेल व शौचालय आवश्यक असल्यास बांधून देण्यात येते.
४स्वदेशच्या अभ्यासानुसार माध्यमिक शाळेमध्ये शौचालय नसल्याने मुलींचे शाळा सोडण्याचे प्रमाण जास्त आहे, म्हणून स्वदेशने माध्यमिक शाळेमध्ये शौचालय व शुद्ध पाणी देण्याचा उपक्र म हाती घेतला.
५१०१ माध्यमिक शाळांमध्ये नवीन शौचालय व मुतारी बांधकाम, जुने शौचालय दुरुस्ती व शुद्ध पाणी संयंत्र बसवण्यात आले.