शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या 363 महिला, किती जिंकल्या? असा राहिला महायुतीचा स्ट्राइक रेट
7
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
8
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
9
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
10
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
11
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
12
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
13
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
14
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
15
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
16
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
17
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
18
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
19
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान

सहा तालुक्यांमध्ये १९,२८१ घरांमध्ये वैयक्तिक शौचालये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 03, 2017 2:00 AM

रायगड जिल्ह्यातील सहा तालुक्यांमध्ये स्वदेश फाउंडेशनच्या वतीने आजपर्यंत १९,२८१ घरांमध्ये वैयक्तिक शौचालये व १०१ माध्यमिक शाळांमध्ये शौचालयांचे बांधकाम करण्यात आले.

उदय कळसम्हसळा : रायगड जिल्ह्यातील सहा तालुक्यांमध्ये स्वदेश फाउंडेशनच्या वतीने आजपर्यंत १९,२८१ घरांमध्ये वैयक्तिक शौचालये व १०१ माध्यमिक शाळांमध्ये शौचालयांचे बांधकाम करण्यात आले. यामुळे स्वच्छ भारत अभियानात महाड, पोलादपूर, माणगाव, तळा, म्हसळा, श्रीवर्धन हे तालुके हागणदारीमुक्त बनवण्यासाठी ‘स्वदेश’चे विशेष योगदान आहे.स्वदेश फाउंडेशनचे विश्वस्त रॉनी स्क्रूवाला व झरिना स्क्रूवाला यांनी स्वच्छ भारत अभियान सुरू होण्यापूर्वीच ग्रामस्थांची गरज ओळखून २००३पासून घरांमध्ये वैयक्तिक शौचालये बांधण्याचाउपक्रम सुरू केला. ग्रामस्थांना शौचालयाचे महत्त्व पटवून देण्यासाठी स्वदेशचे ३३० सामाजिक कार्यकर्ते, स्वरक्षामित्र यांनी ३६० ग्रामपंचायतींमध्ये प्रबोधन केले, यासाठी शालेय विद्यार्थ्यांची मोलाची मदत झाली. मुलांनी स्वदेशच्या मदतीने शौचालय बांधण्यासाठी पालकांना व ग्रामस्थांना तयार केले. शासनाने निर्मल भारत व स्वच्छ भारत अभियान सुरू केल्यावर शौचालय बांधण्याच्या मोहिमेमध्ये जिल्हा परिषद रायगडच्या स्वच्छ भारत मिशन कक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, सहा तालुक्यांचे गटविकास अधिकारी सर्व ग्रामसेवकांनी स्वदेशच्या मदतीने गावोगावी बैठका घेतल्या व शौचालय बांधण्यासाठी मोहीम हाती घेतली. सहा तालुक्यांमध्ये प्रबोधनासाठी स्वच्छता रथ तयार करून स्वच्छता रथावर तयार शौचालयाचे मॉडेल दाखवण्यात आले. याला चांगला प्रतिसाद मिळाला.१स्वदेश फाउंडेशन बांधून देत असलेल्या शौचालयाची किंमत २४००० रु पये आहे. लोकवर्गणी प्रत्येक कुटुंब ५००० रु पये घेण्यात येते.२कुटुंबप्रमुख जर विधवा, निराधार असेल, कुटुंब आदिवासी असेल तर ५०० रु पये वर्गणी घेण्यात येते.३शासनाच्या यादीमध्ये नोंद नसेल व शौचालय आवश्यक असल्यास बांधून देण्यात येते.४स्वदेशच्या अभ्यासानुसार माध्यमिक शाळेमध्ये शौचालय नसल्याने मुलींचे शाळा सोडण्याचे प्रमाण जास्त आहे, म्हणून स्वदेशने माध्यमिक शाळेमध्ये शौचालय व शुद्ध पाणी देण्याचा उपक्र म हाती घेतला.५१०१ माध्यमिक शाळांमध्ये नवीन शौचालय व मुतारी बांधकाम, जुने शौचालय दुरुस्ती व शुद्ध पाणी संयंत्र बसवण्यात आले.