कर्जत : ‘राहुल धारकर फार्मसी महाविद्यालयाचे चांगले नाव आहे. अनेक उपक्र म राबवून विद्यार्थी घडविण्याचे काम या महाविद्यालयाच्या माध्यमातून करण्यात येते. पुढील वर्षापासून बॉम्बे कॉलेज आॅफ फार्मसी विविध उपक्र म राबविण्यासाठी सहकार्य करेल. विद्यार्थ्यांनी फार्मसीमध्ये करिअर करताना गुरु जनांचा व त्या - त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. विद्यार्थी कितीही मोठा झाला तरी त्याने आपल्या शिक्षण संस्थेला व शिक्षकांना विसरता कामा नये. तसेच आपल्या ज्ञानाचा उपयोग उपेक्षितांना कसा होईल याचा विचार करावा. इंडस्ट्रीज आणि अन्य जणांच्या सहकार्याने येथे एक अद्ययावत प्रयोगशाळा विकसित करू’, असे आश्वासन इंडियन फार्मास्युटिकल असोसिएशनचे सचिव नितीन मणियार यांनी येथे दिले.कोकण ज्ञानपीठ राहुल धारकर फार्मसी महाविद्यालयाच्या ‘फार्मा फिएस्टा’ वार्षिक स्नेहसंमेलनाच्या पारितोषिक वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. इंडियन फार्मास्युटिकल असोसिएशनचे सचिव नितीन मणियार यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून समारंभाचे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी संस्थेच्या अध्यक्षा अनुपमा धारकर वांगडी, उपाध्यक्ष कॅप्टन सारीपुता वांगडी, खजिनदार झुलकरनैन डाभिया, सचिव प्रदीप शृंगारपुरे, नगराध्यक्ष रजनी गायकवाड, विजयकुमार घाडगे, डॉ. रवींद्र देशमुख आदी उपस्थित होते.अमित पांडे याने मनोगत व्यक्त केले. आभार प्रदर्शन विद्यार्थी प्रतिनिधी प्रथमेश मालकर याने केले. विजयकुमार घाडगे यांनी आपल्या मनोगतात क्षयरोगाविषयी व डॉट औषधाविषयी सविस्तर माहिती दिली. (वार्ताहर)
ज्ञानाचा उपयोग उपेक्षितांसाठी करा
By admin | Published: February 17, 2017 2:12 AM