नवनवीन तंत्रज्ञान वापरा
By Admin | Published: March 25, 2017 01:27 AM2017-03-25T01:27:32+5:302017-03-25T01:27:32+5:30
औषधोपचारातील प्रगत तंत्रज्ञानाचा, तसेच जनजागृतीसाठी प्रसार व प्रसिद्धीच्या नवनवीन तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून क्षयरोग
अलिबाग : औषधोपचारातील प्रगत तंत्रज्ञानाचा, तसेच जनजागृतीसाठी प्रसार व प्रसिद्धीच्या नवनवीन तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून क्षयरोग निर्मूलनाचे काम करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन रायगड जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.अविनाश गोटे यांनी शुक्रवारी येथे केले.
सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जागतिक क्षयरोग दिनानिमित्त कुरूळ (अलिबाग) येथे आयोजित केलेल्या कार्यक्र मात प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. गोटे बोलत होते. ते म्हणाले, केंद्र शासनाने विशेष कार्यक्रमांतर्गत २०२५ पर्यंत क्षयरोग निर्मूलनाचे उद्दिष्ट ठेवले आहे. यासाठी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेने क्षयरोगाचे छुपे रु ग्ण शोधून त्यांना उपचाराच्या कार्यक्रमांतर्गत आणणे महत्त्वाचे आहे. एकही रु ग्ण दुर्लक्षित राहता कामा नये. याची काळजी घेणे आवश्यक आहे. प्रगत औषधोपचाराबरोबरच क्षयरोगाविषयी जनसमान्यांमध्ये जागृती होऊन रोग निर्मूलनासाठी त्याचा उपयोग व्हावा, याकरिता प्रसारमाध्यमांच्या नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा, तसेच या कार्यक्रमात प्रत्येकाने सहभाग घ्यावा,असे आवाहनही केले.
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अजित गवळी म्हणाले, क्षयरोग निर्मूलनाच्या कामात राज्यात रायगड जिल्ह्याचा क्रमांक दुसरा लागतो. जिल्ह्यात संशयित क्षयरुग्णांना तातडीने उपचार मिळावे, फक्त खोकला येतो त्यासाठी आलेल्या रुग्णांच्या तपासणीसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात येणार आहे. आज गौरवपत्र देवून सन्मान करण्यात आलेल्या जिल्ह्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी यापुढेही क्षय रु ग्ण शोधमोहिमेत व क्षयरोग रु ग्णांच्या उपचारासाठी चांगले काम करावे.
वर्षभरात १८ लाख लोकांना क्षयरोग होतो. तीन ते चार लाख मृत्यू होतात. देशात एक हजार रु ग्ण एका दिवसात मरण पावतात. एक थुंकी दूषित रु ग्ण वर्षात दहा ते पंधरा नवे रुग्ण तयार करतो. क्षयरोग प्रामुख्याने कमावत्या वयोगटातील व्यक्तींना होत असल्यामुळे कुटुंबाची व देशाची हानी होते, अशी माहिती डॉ.सुरेश देवकर यांनी प्रास्ताविकात दिली. क्षयरोग निर्मूलनासाठी उत्कृष्ट काम केलेल्या क्षयरोग पथकातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचा गौरवपत्र देऊन यावेळी सन्मान करण्यात आला. तसेच क्षयरोगासंदर्भात जनजागृतीसाठी आयोजित केलेल्या निबंध स्पर्धा, रांगोळी स्पर्धेतील विजेत्यांना गौरवपत्र देवून सन्मानित करण्यात आले.यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अजित गवळी, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. सुरेश देवकर, परिवहन मंडळाचे व्यवस्थापक अनिल गीते आदींसह आरोग्य पथकातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.