इंग्रजीसाठी ‘फोनेटिक्स’चा प्रयोग
By Admin | Published: January 24, 2017 05:53 AM2017-01-24T05:53:13+5:302017-01-24T05:53:13+5:30
शिक्षणाची वारी या उपक्र मात शिक्षणातील अनेक नवे उपक्रम राबविण्यात आले. यात रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील
नेरळ : शिक्षणाची वारी या उपक्र मात शिक्षणातील अनेक नवे उपक्रम राबविण्यात आले. यात रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील मानीवली येथील शिक्षक माहेश खाडे यांनी स्पोकन इंग्रजीच्या अंतर्गत इंग्रजी भाषा समृद्धीचा अभिनव उपक्रम राबविला. हा उपक्रम रायगड जिल्ह्यातील २५० शाळांमध्ये राबविला जात आहे. ही पद्धत जर राज्यातील सर्वच शाळांमध्ये राबविली तर शालेय विद्यार्थ्यांना झटपट इंग्रजी बोलणे व वाचणे शक्य होणार आहे.
कर्जत तालुक्यातील मानीवली गावातील जिल्हा परिषदेत कार्यरत शिक्षक महेश खाडे हा उपक्र म तीन वर्षांपासून रावबत आहेत. सर्वशिक्षा अभियानांतर्गत ‘शिक्षणाची वारी २०१७ ’ या उपक्र मांतर्गत पुणे, नागपूर, औरंगाबाद, येथे नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रम स्टॉल मांडले होते. त्यात महाराष्ट्रतील ५० शिक्षकांमध्ये त्यांची निवड केली. या उपक्र माचा रायगड जिल्ह्यात तृतीय क्र मांक आला आणि महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन परिषद, पुणे यांच्याकडून प्रशस्तीपत्र मिळाले आहे. तसेच प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम, महाराष्ट्र राज्य शालेय शिक्षण विभाग, विद्या प्राधिकरण पुणे द्वारा आयोजित २०१६-१७ च्या औरंगाबाद शिक्षणाच्या वारीत स्पोकन इंग्लिश या विषयांतर्गत फोनेटिक्सच्या साह्याने जलद गतीने अचूक वाचन, या स्टॉलचे उत्कृष्ट सादरीकरण करून प्रगत शैक्षणिक महाराष्ट्राच्या शिक्षणाची वारी या
उपक्रमात यशस्वी सहभाग घेतल्याबद्दल कार्यक्र माच्या समारोप प्रसंगी महाराष्ट्र राज्याचे प्रधान सचिव यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देण्यात आले. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र
कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्र सरकारच्या शिक्षण विभागाच्या वतीने शिक्षणाची वारीचे तीन टप्प्यात आयोजित केली होती. यात महाराष्ट्रातील १२ हजार शिक्षकांनी भेटी दिल्या. तसेच मुख्यमंत्री, शिक्षण मंत्री, उर्जा मंत्री, आमदार, सचिव, उपसचिव, आयुक्त, कुलगुरु , मुख्य कार्यकारी अधिकारी, संचालक, उपसंचालक, विविध जिल्ह्यातील शिक्षणाधिकारी, प्राचार्य, उपशिक्षणाधिकारी, गटशिक्षणा -धिकारी, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, शिक्षण तज्ञ, पत्रकार, सामाजिक संस्था यांनी भेटी दिल्या व उपक्र मा बद्दल माहिती जाणून घेतली. (वार्ताहर)