अरुणकुमार मेहत्रेकळंबोली: अमर धाम स्मशानभूमीत मृतदेहावर अंत्यसस्कार करण्यासाठी पीपीई किटचा वापर केला जात आहे. वापरात आलेल्या पीपीई किटची शास्त्रशुध्द पद्धतीने व्हिलेवाट लावली जात आहे. तरी मास्क मात्र स्मशानभूमीच्या भिंतीलगत झुडपात टाकण्यात येत आहेत. त्यामुळे परिसरातील नागरिकांना धोका निर्माण झाला आहे.
पनवेल पालिका क्षेत्रात कोरोनाबाधितांची आकडेवारी कमी झाली असली, तरी धोका कायम आहे. याबाबत महापलिका प्रशासनाकडून योग्य काळजी घेतली जात जात असल्याचे दर्शविले जात आहे, परंतु परिस्थिती वेगळीच असल्याचे फेकलेल्या मास्कवरून उघड झाले आहे. कोरोना रुग्णांवर डॉक्टरांकडून, परिचारिका यांच्याद्वारे उपचार करण्यासाठी, तसेच कोरोनाबाधित मृतदेहावर अंत्यसस्कार करण्यासाठी मास्क, पीपीई किटचा वापर करण्यात येतो. अमरधाम स्मशानभूमीत महापलिका क्षेत्रातील कोरोनामुळे झालेल्या मृत व्यक्तीवर पालिकेद्वारे अंत्यसंस्कार केले जात आहे. त्यासाठी पीपीई किट, तसेच मास्कचा वापर करण्यात येतो. वापरात आलेले मास्क स्मशानभूमीच्या भिंतीलगत फेकून दिल्याने, या परिसरात वावरणाऱ्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे. स्मशानभूमी पनवेल शहरात असल्याने या ठिकाणी नागरिकांची वर्दळ मोठ्या प्रामाणात असते. त्यामुळे कोरोना संसर्ग रोगाची लागण होऊ शकते. मास्क फेकणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
ही दुसरी घटनाया आधी ३१ जुलै रोजी अमरधाम स्मशानभूमीलगत कचराकुंडीत पीपीई किट टाकण्यात आली होती. त्याबाबतचे ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध करताच, परिसरात महापालिकेकडून साफसफाई करण्यात आली. काही दिवस याबाबत काळजी घेण्यात आली. आता विसर पडल्याने परिसरात मास्क फेकण्याचे प्रकार घडत आहेत.