वापरलेले पीपीई किट उघड्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2020 12:51 AM2020-07-27T00:51:43+5:302020-07-27T00:52:11+5:30

नेरळ-कर्जत मार्गावरील घटना : नागरिकांकडून संबंधितावर कारवाईची मागणी

Used PPE kit open space | वापरलेले पीपीई किट उघड्यावर

वापरलेले पीपीई किट उघड्यावर

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
कर्जत : कोरोनाचे संकट एकीकडे असताना, दवाखान्यात वापरण्यात येणारे पीपीई किट (जैविक कचरा) चुकीच्या पद्धतीने सार्वजनिक ठिकाणी टाकले जात आहे. याकडे संबंधित प्रशासनाने बेजबाबदारपणे वागणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी आता स्थानिक ग्रामस्थांकडून होत आहे.
कोरोनाने जगभर थैमान घातले असून, कर्जत तालुक्यात कोरोनाच्या रुग्णाची संख्या ही दिवसागणिक वाढत आहे. त्यामुळे कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी प्रशासनाकडून युद्धपातळीवर वेगवेगळ्या उपाययोजना राबवल्या जात आहेत. असे असताना कर्जत-कल्याण मार्गाला लागून असणाºया वृद्धाआश्रमाजवळील रस्त्यावर कोरोना रुग्णांवर उपचार करत असताना, वापरत येत असलेले संपूर्ण पीपीई किट, मास्क हे रस्त्याच्या बाजूला टाकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे दिवसभर घरात राहिल्याने शरीराची हालचाल होत नसल्याने, अनेक नागरिक मॉर्निंग वॉकसाठी या भागात येत असतात. दिवसाच्या सुरुवातीला सकाळी शुद्ध हवा व शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आलेल्या नागरिकांना हा प्रकार आढळून आला आहे. पीपीई किट आढळून आलेल्या रस्त्याला लागूनच असलेल्या वृद्धाश्रमात काही दिवसांपूर्वी बारा जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटनाही समोर आली. यामुळे चिंतेचे वातावरण असताना, अशा प्रकारे रस्त्याच्या कडेला उघड्यावर वापरलेले पीपीई किट आढळून आल्याने नागरिकांनी मोठी चिंता व्यक्त केली आहे.
नक्की हा कचरा कोणी टाकला, हे जरी माहित नसले, तरी अशा पद्धतीत हा कचरा कुठेही सार्वजनिक ठिकाणी सापडून येत असल्याने, नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत व एकूणच प्रशासनाच्या कामाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित निर्माण होत आहे.
भीतीचे वातावरण
च्डॉक्टर, परिचारिका व स्वचछता कर्मचारी, वाहनचालक यांना वापरण्यात येणाºया पीपीई किट, तसेच अन्य जैविक कचरा हा एका विशिष्ट पद्धतीने नष्ट करावा लागतो किंवा काही संस्थांमार्फंत हा कचरा उचलून नेला जातो, परंतु रविवारी सकाळी या भागात हा जैविक कचरा सार्वजनिक ठिकाणी आढळून आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. याबाबत स्थानिक रहिवाशांकडून बेजबाबदार वागणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

Web Title: Used PPE kit open space

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.