वाहन पार्क करताय कर्जतकरांनो सावधान!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2017 12:44 AM2017-07-31T00:44:23+5:302017-07-31T00:44:23+5:30
मुंबई-पुण्याच्या मध्यवर्तीचे ठिकाण म्हणून कर्जतची ओळख आहे, तिसरी मुंबई म्हणून कर्जत तालुका झपाट्याने वाढत चालला आहे
कर्जत : मुंबई-पुण्याच्या मध्यवर्तीचे ठिकाण म्हणून कर्जतची ओळख आहे, तिसरी मुंबई म्हणून कर्जत तालुका झपाट्याने वाढत चालला आहे, त्यामुळे तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात बांधकाम होत आहेत. तालुक्याचे मुख्य शहर म्हणून कर्जतची ओळख आहे. या ठिकाणी येणाºया वाहनांमुळे शहरातील रहदारीचा प्रश्न मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे, यावर उपाय म्हणूण कर्जत नगर परिषद, वाहतूक नियंत्रण अधिकारी (आरटीओ) आणि कर्जत पोलीस ठाण्याच्या वतीने कर्जत शहरातील पार्किंग आणि रहदारी विषयी एक आराखडा यापूर्वीच तयार केला आहे, त्यावर अंमलबजावणी सुरू होती, त्यामुळे कुठेही आणि कशीही वाहने उभी करणाºयांवर दंडात्मक कारवाई होत होती. मात्र, संबंधित ठेकादाराचा ठेका संपल्याने चार-पाच महिने कारवाई बंद होती. मात्र, ही कारवाई सोमवार, ३१ जुलैपासून सुरू होणार आहे, त्यामुळे कर्जतच्या रस्त्यावर कशीही, कुठेही वाहने उभी करणाºयांनो सावधान, तुमच्यावरही कारवाई होऊ शकते.
कर्जत नगरपरिषदेच्या स्थापनेला २५ वर्षे झाली, त्याआधी कर्जत ग्रामपंचायत अस्तित्वात होती, कर्जत हे मुंबई आणि पुणे या दोन मोठ्या रेल्वेस्थानकांच्या मधील शहर असल्याने त्याचा विकास झपाट्याने सुरू आहे. तिसरी मुंबई म्हणून आता कर्जत शहराची ओळख दिसू लागली आहे. शहराबाहेरील मुख्य रस्ते रु ंद झाले असून ते चांगले झाले आहेत, त्यावर वाढलेली रहदारी, त्यामुळे कर्जत शहरात येणारी वाहनांची संख्या त्यामुळे शहराच्या मुख्य बाजारपेठेत होणारी वाहतूककोंडी हा आता कर्जतकरांचा रोजचाच त्रास झाला आहे. त्यामधून सर्वसामान्य नागरिकाला चालणे कठीण झाले आहे. कर्जत शहरातील मुख्य बाजारपेठेतील रस्ते काही प्रमाणात रु ंद झाले आहेत. मात्र, शहरातील काही इमारती या ग्रामपंचायत असताना बांधल्या गेल्या आहेत, त्यामुळे त्यांना इमारतीखाली पार्किंग नाही आणि काही इमारती या नगरपरिषद झाल्यावर बांधण्यात आल्या आहेत. मात्र, या इमारतीना पार्किंगची सोय न करता सर्व नियम धाब्यावर बसवून बिल्डरांनी इमारती बांधल्या आहेत. त्या इमारतींमध्ये फ्लॅट घेणाºयांना सध्या पार्किंग सोय नसल्यामुळे ते आपली मोटारसायकल असो की कार, रस्त्यावर उभी करत आहेत.
शहरातील काही रस्ते तर पार्किंग झोन झाले आहेत. त्या रस्त्यांवर दिवसा जा की रात्री फेरी मारा, त्या ठिकाणी गाड्या उभ्या आहेत, ही बाब चिंताजनक आहे.
बाजारपेठेतील रस्ते काही प्रमाणात रु ंद झाले आहेत. मात्र, ते रु ंद झालेले रस्ते फक्त रात्रीच मोठे झालेले दिसतात. अन्यथा, दिवसा प्रत्येक दुकानदाराचे सामान आपल्या दुकानाच्या पाच-सात फूट बाहेर आलेले असते, काहींच्या दुकानाचे फलक रस्त्यावर ठेवलेले असतात आणि त्याच रस्त्यावर फेरीवाले असतात आणि त्यामध्ये एखादे वाहन आले तर वाहतूककोंडी होते. त्यामधून रस्ता शोधून पादचारी चालत असतो.