महाडमध्ये पोलीस कर्मचाऱ्यांच्या जागा रिक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2020 01:24 AM2020-12-04T01:24:05+5:302020-12-04T01:24:16+5:30

पोलादपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने या ठिकाणी राष्ट्रीय महामार्ग व राज्य मार्गावर होणारे अपघात, घाट रस्त्यावर घडणारे गुन्हे त्यामुळे पोलीसबळ वाढविण्याची गरज आहे.

Vacancies for police personnel in Mahad | महाडमध्ये पोलीस कर्मचाऱ्यांच्या जागा रिक्त

महाडमध्ये पोलीस कर्मचाऱ्यांच्या जागा रिक्त

googlenewsNext

बिरवाडी : महाड उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यक्षेत्रामध्ये येणाऱ्या पोलीस ठाण्यांमधील पोलीस कर्मचाऱ्यांच्या अनेक रिक्त पदांमुळे उपलब्ध कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण येत आहे.

महाड उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यक्षेत्रामध्ये महाड शहर, महाड तालुका, महाड एमआयडीसी, पोलादपूर या पोलीस ठाण्यांमध्ये मंजुरी पदांच्या तुलनेने हजर असणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे. महाड तालुक्यामध्ये एक नगरपालिका, १३४ ग्रामपंचायती, औद्योगिक वसाहत, किल्ले रायगड, चवदार तळे यांचा समावेश असल्याने या ठिकाणी बंदोबस्त तसेच गुन्हेगारी रोखण्याकरिता पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागते. त्यासोबतच पुणे-रत्नागिरी जिह्याच्या सीमा लगत असल्याने कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे पोलीस यंत्रणेला अधिक सतर्क राहावे लागते. तर पोलादपूर तालुक्यामध्ये एक नगरपंचायत व ४२ ग्रामपंचायती व सातारा-रत्नागिरी जिह्याचा सीमाभाग पोलादपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने या ठिकाणी राष्ट्रीय महामार्ग व राज्य मार्गावर होणारे अपघात, घाट रस्त्यावर घडणारे गुन्हे त्यामुळे पोलीसबळ वाढविण्याची गरज आहे.

पोलिस कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरण्याकरिता सरकारकडे पाठपुरावा करणार असून शहरामध्ये पोलिसांकरिता उभारण्यात आलेली निवासस्थाने लवकरच कर्मचाऱ्यांकरिता उपलब्ध व्हावीत याकरिता नवीन वसाहतीचा लोकार्पण सोहळा तत्काळ व्हावा, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करणार आहोत. - भरत गोगावले, आमदार

Web Title: Vacancies for police personnel in Mahad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.