लाेकमत न्यूज नेटवर्करायगड : जिल्ह्यात लसींचा साठा संपल्याने गेल्या चार दिवसांपासून ८४ केंद्रांवरील लसीकरण ठप्प झाले आहे. लसच उपलब्ध नसल्याने नागरिकांना लसीकरण केंद्रावरून माघारी फिरावे लागत आहे. नाेंदणी करूनदेखील लस उपलब्ध हाेत नसल्याने नागरिक मात्र कमालीचे हैराण झाले आहेत. लसीकरण केंद्रावरील गर्दी टाळण्यासाठी केंद्राच्या २०० मीटर परिसरात संचारबंदी लागू केली आहे. जिल्ह्यात काेराेना महामारीचा फैलाव अद्यापही थांबलेला नाही. वाढणारी रुग्णसंख्या आणि रुग्णांचे मृत्यू यांना आवर कसा घालायचा, या विवंचनेत प्रशासन सापडले आहे.सरकारने लाॅकडाऊन केले आहे, मात्र अद्यापही त्याचा म्हणावा तसा सकारात्मक परिणाम दिसत नाही. रुग्णवाढीचा वेग मंदावण्यासाठी पुढील काही दिवस वाट पाहावी लागणार असल्याचे आराेग्य विभागातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. विविध उपाययाेजना करतानाच सरकारने प्रभावीपणे लसीकरण माेहीम राबवण्याचे घाेषित केले. यासाठी फ्रंटलाइन वर्कर, आराेग्य सेवक, ज्येष्ठ नागरिक यांच्या लसीकरणाला सुरुवात केली. त्यानंतर ४५ वर्षांपुढील नागरिकांचे लसीकरण करण्यात येत हाेते. १ मेपासून १८ ते ४४ वयाेगटाला लस देण्याचे काम सुरू आहे. मात्र १८ ते ४४ वयाेगट वगळता अन्य ८४ केंद्रांवरील लसीकरण ठप्प पडले आहे. लसीकरणासाठी नाेंदणी केली आहे, मात्र केंद्रावर लसच शिल्लक नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे रिकाम्या हाताने आम्हाला परतावे लागत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
गेल्या आठवड्यात सुमारे १२ हजार लसींचा साठा प्राप्त झाला हाेता. चार दिवसांपूर्वीच ताे संपलेला आहे. सरकारकडे नव्याने मागणी करण्यात आलेली आहे. परंतु आठ दिवस झाले तरी लसच मिळालेली नाही. लसच नसल्याने जिल्ह्याच्या विविध भागांतील ८४ लसीकरण केंद्रे बंद करण्यात आली आहेत. लस प्राप्त हाेताच पुन्हा लसीकरण करण्यात येईल, असे आराेग्य विभागाचे म्हणणे आहे. १८ ते ४४ वयाेगटातील नागरिकांना लसीकरण करण्यासाठी सुमारे १० हजार डाेस आले हाेते. पाच केंद्रांवर प्रत्येकी दाेन हजार देण्यात आले हाेते. सध्या याच वयाेगटातील नागरिकांच्या लसीकरणासाठी जिल्ह्यातील पनवेल येथे तीन, अलिबाग आणि पेण येथे प्रत्येकी एका केंद्राचा समावेश केला आहे, मात्र अलिबागमधील साठा संपलेला आहे. तसेच अन्य केंद्रांवर अशीच परिस्थिती असल्याचे दिसून येते. जिल्ह्यासाठी आलेला साठा संपलेला आहे. त्यामुळे नागरिक चांगलेच हैराण झाले आहेत. लसींचा साठा कधी मिळणार, याकडे सर्वांचेच डाेळे लागले आहेत.
२०० मीटर परिसरात मज्जावलसीकरण करण्यासाठी माेठ्या संख्येने नागरिक केंद्राकडे धाव घेत आहेत. मात्र लसींचा साठा संपला आहे. फक्त १८ ते ४४ वयाेगटातील नागरिकांना लस टाेचली जात आहे. या वयाेगटाव्यतिरिक्त अन्य काेणालाही लसीकरण केंद्राच्या २०० मीटर परिसरात येण्यास मज्जाव केला आहे. जिल्हाधिकारी निधी चाैधरी यांनी संचारबंदीचे आदेश लागू केले आहेत. नागरिक निष्कारण केंद्रावर गर्दी करत आहेत. त्यामुळे सामाजिक अंतराचे भान राखले जात नाही. त्यामध्ये काेराेना संसर्गाचा धाेका वाढण्याची शक्यता आहे. यासाठी प्रशासनाने या ठिकाणी संचारबंदीचे अस्त्र वापरले असल्याचे बाेलले जाते.
nलसीकरणासाठी पनवेल येथे तीन, अलिबाग, पेण येथे प्रत्येकी एका केंद्राचा समावेश केला आहे, मात्र अलिबागमधील साठा संपलेला आहे.
जिल्ह्यातील लसींचा साठा संपल्याने सरकारकडे मागणी करण्यात आली आहे. पुढील दाेन दिवसांत लस उपलब्ध झाल्यावर वेगाने लसीकरण सुरू हाेईल. सध्या १८ ते ४४ वयाेगटातील नागरिकांचे लसीकरण सुरू आहे.- डाॅ. सुधाकर माेरे, जिल्हा आराेग्य अधिकारी, रायगड