वैध मापनशास्त्र यंत्रणेची पनवेलमध्ये कारवाई, २५ आस्थापनांविरुद्ध खटले दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2017 03:32 AM2017-08-24T03:32:45+5:302017-08-24T03:33:08+5:30

पनवेल महानगरपालिकाक्षेत्रात दूध, शीतपेय आदी आवेष्टित वस्तूंची जादा दराने विक्री केल्याप्रकरणी ३२ व्यावसायिकांविरुद्ध तर किमतीत खाडाखोड करून विक्री केल्याप्रकरणी ६ व्यावसायिकांविरुद्ध अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागांतर्गत कार्यरत वैध मापनशास्त्र यंत्रणेने कारवाई केली.

Valid microscopic mechanisms are filed in Panvel, 25 cases against Establishments | वैध मापनशास्त्र यंत्रणेची पनवेलमध्ये कारवाई, २५ आस्थापनांविरुद्ध खटले दाखल

वैध मापनशास्त्र यंत्रणेची पनवेलमध्ये कारवाई, २५ आस्थापनांविरुद्ध खटले दाखल

Next

- जयंत धुळप ।

अलिबाग : पनवेल महानगरपालिकाक्षेत्रात दूध, शीतपेय आदी आवेष्टित वस्तूंची जादा दराने विक्री केल्याप्रकरणी ३२ व्यावसायिकांविरुद्ध तर किमतीत खाडाखोड करून विक्री केल्याप्रकरणी ६ व्यावसायिकांविरुद्ध अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागांतर्गत कार्यरत वैध मापनशास्त्र यंत्रणेने कारवाई केली. याबाबतची माहिती जिल्हा वैध मापनशास्त्र सहायक नियंत्रक सी. सा. कदम यांनी दिली.
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागांतर्गत वैध मापनशास्त्र यंत्रणा कार्यरत आहे. या यंत्रणेमार्फत वैध मापनशास्त्र अधिनियम २००९ व त्याअंतर्गत नियमातील तरतुदींची अंमलबजावणी केली जाते. गेल्या पाच महिन्यांच्या कालखंडात ही कारवाई कोकण विभागीय वैध मापनशास्त्र नियंत्रक तथा अतिरिक्त पोलीस महासंचालक अमिताभ गुप्ता व वैध मापनशास्त्र उपनियंत्रक ध. ल. कोव यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे राबविण्यात आली असल्याचे कदम यांनी सांगितले.
पनवेल महानगरपालिका क्षेत्रात दूध व शीतपेय आदी आवेष्टीत वस्तूंची जादा दराने विक्र ी होत असल्याबाबत तक्र ारी प्राप्त झाल्या होत्या. त्या अनुषंगाने विशेष तपासणी मोहिमेचे आयोजन केले होते. या मोहिमेंतर्गत पनवेल महानगरपालिका क्षेत्रात व्यापारी आस्थापनांची तपासणी करून एकूण २५ आस्थापनांविरु द्ध खटलेदेखील दाखल करण्यात आले आहेत.
यामध्ये प्रामुख्याने दूध व शीतपेयांची जादा दराने विक्र ी करणे, आवेष्टीत वस्तूंवर नियमानुसार उद्घोषणा नसणे व व्यापाºयाकडील वजने काटे विहित मुदतीत पडताळणी व मुद्रांकन करून न घेणे आदी उल्लंघन संबंधित आस्थापनांकडून झाल्याचे आढळून आले आहे. याबाबत संबंधित आस्थापनांविरुद्ध कायद्यातील तरतुदीनुसार पुढील कार्यवाही चालू आहे.

आवेष्टनांवर नियमानुसार माहिती अनिवार्य
वैध मापनशास्त्र अधिनियम २००९ व त्याअंतर्गत नियमातील तरतुदींनुसार व्यापारी व औद्योगिक आस्थापनांकडे वापरात असलेली वजने मापे यांची नियतकालीक पडताळणी व मुद्रांकन करणे, तसेच आवेष्टीत (पॅकबंद) वस्तूंवर नियमानुसार उद्घोषणा असणे आवश्यक आहे.
आवेष्टीत वस्तूंवर उत्पादकाचे पूर्ण नाव व पत्ता, वस्तूचे नाव, वस्तूचे निव्वळ वजन, माप, पॅकिंग तारीख, कमाल विक्र ी किंमत (सर्व करांसहित), ग्राहक तक्र ार निवारण क्र मांक व ई-मेल, पत्ता आदी उद्घोषणा लिहिणे कायद्याने बंधनकारक आहे. त्याचबरोबर छापील किमतीपेक्षा जास्तदराने विक्र ी, किमतीत खाडाखोड करणे व वस्तू वजन मापात कमी देणे आदी बाबी कायद्यानुसार गुन्हा ठरतात, असे कदम यांनी स्पष्ट केले.

येथे तक्रार करा
आवेष्टीत वस्तूंची जादा दराने विक्र ी, किमतीत खाडाखोड वा वजन मापात कमी देणे, याबाबत ग्राहकांना माहिती मिळाल्यास अथवा शंका असल्यास वैध मापनशास्त्र यंत्रणेच्या हेल्पलाइन क्रं. ०२२-२२६२२०२२ वर संपर्क साधून तक्र ार नोंदवावी, असे आवाहन रायगड वैध मापनशास्त्र सहायक नियंत्रक सी. सा. कदम यांनी केले आहे.

Web Title: Valid microscopic mechanisms are filed in Panvel, 25 cases against Establishments

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.