दिवेआगर खाडीच्या झडपा तुटल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2020 12:13 AM2020-06-20T00:13:38+5:302020-06-20T00:13:44+5:30

शेती जाणार पाण्याखाली : वादळामुळे शेतक ऱ्यांवर दुहेरी संकट

The valves of Diveagar creek were broken | दिवेआगर खाडीच्या झडपा तुटल्या

दिवेआगर खाडीच्या झडपा तुटल्या

Next

दिघी : वादळामुळे अगोदरच शेतकऱ्यांच्या घरांचे नुकसान झाले असताना, त्यातच आता शिस्ते- दिवेआगर मार्गावरील खाडीचे दरवाजे तुटल्याने समुद्राच्या भरतीचे पाणी शेतात घुसू लागले आहे. मात्र, संबंधित प्रशासन हातावर हात ठेवून गप्प बसल्याचे दिसते आहे. यामुळे शेतकºयांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

श्रीवर्धन तालुक्यात निसर्ग चक्रीवादळामुळे अनेक शेतकºयांचे शेती व घरांचे नुकसान झाले आहे. वादळग्रस्तांना अद्याप मदत मिळाली नाही. हे सहन करीत असताना कुठे चार घास खायला मिळतील, या उद्देशाने जगणारा शेतकरी आता दुहेरी संकटात सापडला आहे. दिवेआगर खाडीलगत बोर्लीपंचतन परिसरातील आठ ते दहा गावांतील अनेक शेतकºयांची खारशेती जमीन आहे. त्यात शेतकरी दरवर्षी भाताचे उत्पन्न घेतात. खाडीतून शेतात समुद्राचे पाणी जाऊ नये, यासाठी भक्कम दरवाजे असलेली ‘सात उघडी’ आहेत. मात्र, दोन महिन्यांपूर्वी उधाणाच्या भरतीमुळे हे दरवाजे उद्ध्वस्त झाले. त्यामुळे शेतकºयांची शेकडो हेक्टर शेतजमीन पाण्याखाली गेली. सध्या शेतकरी भातशेती करीत असल्याने भरतीचे पाणी खाडीद्वारे शेतीत येऊ लागल्याने शेतकºयांच्या संकटात आणखीच वाढ झाली आहे. हातात येत असलेल्या लावणीच्या पिकाचे नुकसान झाले, तर लावणी कशी करणार? पावसात भरतीचे पाणी मोठ्या प्रमाणात शेतीत शिरण्याची शक्यता आहे. मग अशा वेळी शेतीचे नुकसानच होण्याची शक्यता नकारता येत नाही.

झडपा बसविण्यासाठीचे अंदाजपत्रक पेण येथील विभागीय कार्यालयात मंजुरीसाठी पाठविले असल्याचे समजते. याबाबत खारभूमी सर्वेक्षण व अन्वेक्षण विभागाचे उपविभागीय अधिकारी अशोक जाधव यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

या वर्षी शेतीचे उत्पन्न नाही
लावणीपूर्वी खाडीला झडपा बसविणे आवश्यक होते. मात्र, ते अद्यापही न झाल्याने भरतीचे पाणी मोठ्या प्रमाणावर शेतात साचले आहे. या खाºया पाण्यात भाताची लावणी कशी करणार? असा प्रश्न संतोष कांबळे व संतोष गोविलकर या शेतकºयांनी उपस्थित केला आहे. संबंधितांनी याकडे लक्ष देण्याची मागणी करण्यात येत आहे.

Web Title: The valves of Diveagar creek were broken

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.