उसरच्या विद्यार्थ्यांनी बांधला वनराई बंधारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2019 11:53 PM2019-12-18T23:53:36+5:302019-12-18T23:53:41+5:30

जलसंवर्धनाचा संदेश : उन्हाळ्यात जनावरांना मिळणार पाणी; ग्रामस्थ समाधानी

The Vanarai Dam built by the students of Usar | उसरच्या विद्यार्थ्यांनी बांधला वनराई बंधारा

उसरच्या विद्यार्थ्यांनी बांधला वनराई बंधारा

googlenewsNext

माणगाव : उन्हाळ्यात पाण्यासाठी होणारी माणसे व जनावरांची त्रेधातिरपीट व पाण्यासाठी करावी लागणारी वणवण यामुळे जलसंवर्धनासाठी प्रतिवर्षी प्रयत्न करणाऱ्या छत्रपती शिक्षण मंडळाच्या अभिनव ज्ञानमंदिर, उसर खुर्द विद्यालयाने ग्रामपंचायतीच्या व ग्रामस्थांच्या सहकार्याने उसर येथील ओहोळावर वनराई बंधारा बांधला आहे. यामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त के ले.


ऐन उन्हाळ्यात उसर पंचक्रोशीत पाण्याची समस्या अतिशय गंभीर असे स्वरूप प्राप्त करते. जंगली श्वापदे, प्राणी व गुरांसाठी पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण होतो. जानेवारी महिन्यानंतर सर्व ओहोळ कोरडे पडतात. यावर उपाय म्हणून ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या मदतीने विद्यालय प्रतिवर्षी दोन ते तीन वनराई बंधारे बांधत असते. या वर्षीही उसर खुर्द येथील ओहोळावर ३०० सिमेंट पिशव्यांचा माती भरावाचा बंधारा बांधला आहे. नोव्हेंबर महिन्यात बांधलेल्या या बंधाºयाचा उपयोग मार्च, एप्रिल महिन्यांपर्यंत ग्रामस्थांना होऊन गाई, गुरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी त्याचा उपयोग होणार आहे.


विद्यार्थ्यांनी अतिशय मेहनत करून श्रमदानातून माती खोदली, पिशव्या भरल्या व शिक्षक ग्रामस्थांच्या मदतीने बंधाºयाचे काम पूर्ण केले. बंधाºयाच्या उद्घाटनासाठी व बांधकामासाठी ग्रामपंचायतीच्या सरपंच सायली घाग, ग्रामपंचायत सदस्य दिलीप पांचाळ, ग्रामसेवक मिसाळ, उसर विद्यालयाचे मुख्याध्यापक बाळासाहेब दुधाळ आदीसह शिक्षकवृंद व ग्रामस्थ उपस्थित होते.

‘पाणी आडवा, पाणी जिरवा’
च्नेरळ विद्यामंदिर, कनिष्ठ महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष श्रमसंस्कार शिबिराचे बेडीसगाव शेलू येथे आयोजन करण्यात आले होते. या वेळी ग्रामस्वच्छता, प्लास्टिकबंदी, अंधश्रद्धा निर्मूलन असे अनेक कार्यक्रम राबविण्यात आले. तसेच ‘पाणी आडवा, पाणी जिरवा’चा संदेश देण्यात आला. शेलू बेडीसगाव येथे राष्ट्रीय सेवा योजनेच्या या श्रमसंस्कार शिबिराचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर अनेक कार्यक्रम राबविण्यास सुरुवात करण्यात आली.
च्या शिबिरात शेलू तसेच बेडीसगावमध्ये ग्रामस्वच्छता, प्लास्टिकबंदी, अंधश्रद्धा निर्मूलन तसेच ओहोळावर छोटे बंधारे बांधून, ‘पाणी आडवा, पाणी जिरवा’चा संदेश ग्रामस्थांना राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी दिला. या वेळी संस्थेचे कोषाध्यक्ष विवेक पोतदार, तसेच मिलिंद पोतदार, मनीषा राठोड, प्राचार्य विचवे, जगताप, हनुमान भगत, राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रमुख चव्हाण, शेलूचे सरपंच शिवाजी खारीक आदी या वेळी उपस्थित होते. मान्यवरांनी ग्रामस्थ, विद्यार्थ्यांना श्रमाचे महत्त्व पटवून दिले.

प्रतिवर्षी आम्ही ग्रामस्थ व ग्रामपंचायतीच्या सहकार्याने वनराई बंधारा बांधतो. यानिमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये जलसंवर्धनाबाबत जागृती व श्रमसंस्कार होतो.
- बाळासाहेब ग. दुधाळ,
मुख्याध्यापक

विद्यालयाचा हा उपक्रम कौतुकास्पद असून, पंचक्रोशीतील गुरांना व प्राण्यांना याचा उपयोग होतो. जलसंवर्धनासही या निमित्ताने हातभार लागतो.
- सायली घाग,
सरपंच, ग्रुप ग्रामपंचायत, उसर

Web Title: The Vanarai Dam built by the students of Usar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.