माणगाव : तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीच्या परिसरात फिरून लोकसहभागातून एकूण ४०० वनराई बंधारे बांधण्याचा संकल्प आणि नियोजन माणगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सतीश गाढवे यांनी केला आहे. त्यासाठी ते स्वत: प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये जाऊन ग्रामस्थांच्या भेटी घेत आहेत.
भागाड ग्रामपंचायतीच्या व माणगाव पंचायत समितीच्या संयुक्त विद्यमाने भागाड ग्रामपंचायत हद्दीतील तासगाव येथील फरशी नदीवर वनराई बंधारा बांधण्यात आला. या वेळी माणगाव पंचायत समिती येथील अधिकारी, निजामपूर जिल्हा परिषद गणातील ग्रामपंचायतींचे ग्रामसेवक, ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या श्रमदानातून ५०० सिमेंटच्या पिशव्यांचा वनराई बंधारा सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत बांधण्यात आला. या बंधाºयात पाणी हे एप्रिल महिना अखेरपर्यंत राहत असल्यामुळे भागाड, तासगाव, येलावडे, तासगाव आदिवासीवाडी, भागाड आदिवासीवाडी येथील गुरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हा मोठ्या प्रमाणात सुटणार आहे.
एप्रिलअखेर बंधाºयाचा सांडवा बंद करण्याचे नियोजन करून या बंधाºयातील पाणी मे महिनाअखेरपर्यंत साठवून ठेवायचे आहे. वनराई बंधाºयाच्या कामाकरिता गटविकास अधिकारी सतीश गाढवे, कृषी अधिकारी बाळकृष्ण काप, विस्तार अधिकारी महेंद्र गायकवाड, भागाड ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक बाळाराम जाधव आदी उपस्थित होते.