वंजारपाडा-देवपाडा रस्त्याची दुरवस्था; वाहनचालकांची कसरत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2020 12:09 AM2020-01-15T00:09:43+5:302020-01-15T00:10:01+5:30

नागरिक त्रस्त : वेडीवाकडी वळणे असल्याने अपघाताची भीती

Vanjarpada-Devpada road condition; Driving Workout | वंजारपाडा-देवपाडा रस्त्याची दुरवस्था; वाहनचालकांची कसरत

वंजारपाडा-देवपाडा रस्त्याची दुरवस्था; वाहनचालकांची कसरत

googlenewsNext

कर्जत : तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत पोशीर अंतर्गत येणाऱ्या वंजारपाडा-देवपाडा-वारे या रस्त्याची दुरवस्था झाल्याने या रस्त्यावर वाहतूक करणे त्रासदायक झाले आहे.

परिसरातील वाढती फार्महाउसची संख्या तसेच अन्य प्रकल्प यामुळे येथे वर्दळ वाढली आहे. पोशीर ग्रामपंचायतीमध्ये येणाºया वंजारपाडा, देवपाडा या रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे. बाजारहाट करावयास जायचे म्हटले तर नेरळ बाजारपेठेशिवाय या गावांना पर्याय नाही; परंतु या गावांतून नेरळ पायी प्रवास करणे शक्य नसल्याने लोक टमटम वा रिक्षा यांचा वापर करतात. हा रस्ता काही भागात इतका खराब झाला आहे की, या रस्त्यावर दुचाकीस्वारांचे अपघात होत आहेत. वेडीवाकडी वळणे, असलेले चढ-उतार व उखडलेल्या खडीमुळे रिक्षाचालक जीव मुठीत घेऊन प्रवासी वाहतूक करतात; परंतु शासनाला जाग न आल्यास मोठा अपघात होऊ शकतो.

या रस्त्याची अवस्था दयनीय झाल्याने दुरुस्ती व्हावी, यासाठी आम्ही ग्रामपंचायतीकडून जिल्हा परिषदेकडे अनुदानाची मागणी करणारा प्रस्ताव टाकला आहे. मंजूर असलेल्या निधीमध्ये काही मीटरपर्यंत रस्ता होऊ शकतो; परंतु पूर्ण चार किलोमीटर रस्त्यासाठी आणखी अनुदानाची गरज आहे. त्यासाठी पाठपुरावा आम्ही करत आहोत. - हरिश्चंद्र निरगुडा, सरपंच, पोशीर

लवकर रस्ता न झाल्यास आम्ही होणाºया अपघातांना शासनाला जबाबदार धरून त्यासाठी मोर्चे काढू व संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करायला भाग पाडू. - रमेश राणे, देवपाडा ग्रामस्थ

हा रस्ता लवकर न झाल्यास मोठा अपघात होऊ शकतो, तरी हा रस्ता प्रशासनाने मार्गी लावावा. - ज्ञानेश्वर राणे, देवपाडा ग्रामस्थ

Web Title: Vanjarpada-Devpada road condition; Driving Workout

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.