कर्जत : तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत पोशीर अंतर्गत येणाऱ्या वंजारपाडा-देवपाडा-वारे या रस्त्याची दुरवस्था झाल्याने या रस्त्यावर वाहतूक करणे त्रासदायक झाले आहे.
परिसरातील वाढती फार्महाउसची संख्या तसेच अन्य प्रकल्प यामुळे येथे वर्दळ वाढली आहे. पोशीर ग्रामपंचायतीमध्ये येणाºया वंजारपाडा, देवपाडा या रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे. बाजारहाट करावयास जायचे म्हटले तर नेरळ बाजारपेठेशिवाय या गावांना पर्याय नाही; परंतु या गावांतून नेरळ पायी प्रवास करणे शक्य नसल्याने लोक टमटम वा रिक्षा यांचा वापर करतात. हा रस्ता काही भागात इतका खराब झाला आहे की, या रस्त्यावर दुचाकीस्वारांचे अपघात होत आहेत. वेडीवाकडी वळणे, असलेले चढ-उतार व उखडलेल्या खडीमुळे रिक्षाचालक जीव मुठीत घेऊन प्रवासी वाहतूक करतात; परंतु शासनाला जाग न आल्यास मोठा अपघात होऊ शकतो.या रस्त्याची अवस्था दयनीय झाल्याने दुरुस्ती व्हावी, यासाठी आम्ही ग्रामपंचायतीकडून जिल्हा परिषदेकडे अनुदानाची मागणी करणारा प्रस्ताव टाकला आहे. मंजूर असलेल्या निधीमध्ये काही मीटरपर्यंत रस्ता होऊ शकतो; परंतु पूर्ण चार किलोमीटर रस्त्यासाठी आणखी अनुदानाची गरज आहे. त्यासाठी पाठपुरावा आम्ही करत आहोत. - हरिश्चंद्र निरगुडा, सरपंच, पोशीरलवकर रस्ता न झाल्यास आम्ही होणाºया अपघातांना शासनाला जबाबदार धरून त्यासाठी मोर्चे काढू व संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करायला भाग पाडू. - रमेश राणे, देवपाडा ग्रामस्थहा रस्ता लवकर न झाल्यास मोठा अपघात होऊ शकतो, तरी हा रस्ता प्रशासनाने मार्गी लावावा. - ज्ञानेश्वर राणे, देवपाडा ग्रामस्थ