तेलवडे येथे विद्यार्थ्यांच्या श्रमदानातून वनराई बंधारा
By admin | Published: December 24, 2016 03:15 AM2016-12-24T03:15:49+5:302016-12-24T03:15:49+5:30
मुरूड येथील वसंतराव नाईक महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने मुरूड तालुक्यातील तेलवडे येथे या श्रमसंस्कार
आगरदांडा : मुरूड येथील वसंतराव नाईक महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने मुरूड तालुक्यातील तेलवडे येथे या श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये अनेक लोकोपयोगी उपक्र म हाती घेतले असून, ‘पाणी आडवा, पाणी जिरवा’ हा उपक्र म हाती घेतला आहे. याकरिता गुरुवारी महाविद्यालयाच्या ‘राष्ट्रीय सेवा योजना’च्या १०० विद्यार्थ्यांनी सकाळी ८ वाजल्यापासून मुरूड -तेलवडे ग्रामपंचायत हद्दीतील कोडीनदीवर जाऊन वनराई बंधारा बांधण्यास सुरु वात केली. विद्यार्थी व विद्यार्थिनींनी रिकाम्या १००० सिमेंटच्या गोणीत बारीक खडी भरून बंधारा बांधला आहे.
या वेळी सरपंच प्रज्ञा बैकर, गटविकास अधिकारी एस. चव्हाण, समाजसेवक कृ ष्णा म्हात्रे, तंटामुक्ती उपाध्यक्ष वसंत मोरे, महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. विश्वास चव्हाण,डॉ. श्रीशैल भैरगुंडे, डॉ. जनार्दन कांबळे, उपसरपंच नारायण पाटील, ग्रामसेवक विराज माळी आदी मान्यवर उपस्थित होते. सरपंच प्रज्ञा बैकर म्हणाल्या की, ‘आज विद्यार्थ्यांनी या कडक उन्हात घनदाट डोंगराळ भागात जाऊन, पाच फुटींचा बंधारा बांधला ही बाब कौतुकास्पद आहे. लोकोपयोगी उपक्रम राबविल्याने महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थ्यांचे कार्यक्रम अधिकारी डॉ. श्रीशैल भैरगुंडे व डॉ. जनार्दन कांबळे यांनी अभिनंदन केले. (वार्ताहर)