वर्षानंतरही पुगाव पूल तुटलेल्या अवस्थेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2017 12:48 AM2017-07-31T00:48:27+5:302017-07-31T00:48:27+5:30
तालुक्यातील पुगाव (मढाली) येथील तब्बल १९ गावांना जोडणारा रहदारीचा पूल गेल्या वर्षीपासून तुटलेल्या अवस्थेत आहे. या धोकादायक तुटलेल्या पुलावरून
रोहा : तालुक्यातील पुगाव (मढाली) येथील तब्बल १९ गावांना जोडणारा रहदारीचा पूल गेल्या वर्षीपासून तुटलेल्या अवस्थेत आहे. या धोकादायक तुटलेल्या पुलावरून १९ गावांतील जनता आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करीत असल्याने येथे मोठा अनर्थ होण्याची शक्यता आहे. एका वर्षाच्या नंतरही अद्याप या पुगाव पुलाच्या प्रश्नाकडे ना कोणत्या राजकीय नेत्याचे लक्ष आहे ना संबंधित प्रशासनाचे, त्यामुळे १९ गावांतील जनतेला धोकादायक प्रवास करावा लागत असल्याने, प्रशासनाच्या या गलथान कारभारापुढे येथील जनता हतबल झाली आहे.
डोलवल बंधाºयाकडून आरसीएफकडे जाणारा तीर हा कालवा आहे. हा कालवा रस्त्यालगत असल्याने पुढील रहदारी करता त्याच्यावर पूल टाकण्यात आला आहे. हा पूल तब्बल १९ गावांसाठी महत्त्वाचा वाहतुकीचा मार्ग ठरत आहे, परंतु हा पूल अतिशय जीर्ण झाल्याने तो मागील वर्षापूर्वी अचानक कोसळला व १९ गावातील जनतेचा संपर्क तुटला आहे. त्यामुळे येथील जनतेला महत्त्वाची बाजारपेठ असणाºया कोलाड नाक्यावर किंवा खांबला यावयाचे झाले तर कालव्याच्या दिशेने उलटा प्रवास करावा लागतो. अगदी जवळ पाच ते सहा किलोमीटर अंतरावर असणारी बाजारपेठ आता पंधरा ते वीस किलोमीटरच्या दूर अंतरावर पडत आहे. त्यामुळे येथील जनतेची गैरसोय झाली आहे. काही दिवसांपूर्वी विटा घेऊन जाणारा मालवाहू ट्रक कालव्यात पलटी झाला. सुदैवाने यात जीवित हानी झाली नसली तरी या गाडीचे व वीट मालकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. जर हा तुटलेला पूल अचानक खाली जावून अपघात घडला तर याला जबाबदार कोण? असा प्रश्न जनतेकडून उपस्थित होत आहे.