दूषित पाण्यामुळे खेकड्यासह विविध जातीचे मासे मृत्युमुखी

By निखिल म्हात्रे | Published: March 5, 2024 05:34 PM2024-03-05T17:34:46+5:302024-03-05T17:35:53+5:30

थळ येथे गेल्या अनेक वर्षांपासून खतनिर्मित आरसीएफ कंपनी आहे.

various species of fish including crabs die due to contaminated water | दूषित पाण्यामुळे खेकड्यासह विविध जातीचे मासे मृत्युमुखी

दूषित पाण्यामुळे खेकड्यासह विविध जातीचे मासे मृत्युमुखी

निखिल म्हात्रे, लोकमत न्युज नेटवर्क, अलिबाग  - सोमवारी संध्याकाळी थळमधील खाडीत मासे अचानक मृत्युमुखी पडलेले आढळून आले. यामुळे हातावर पोट असलेल्या मच्छिमारांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अलिबाग तालुक्यातील थळ येथील आरसीएफ कंपनीच्या दूषित पाण्यामुळे हे मासे मृत्युमुखी पडल्याचा आरोप मच्छिमारांनी केला आहे. 

थळ येथे गेल्या अनेक वर्षांपासून खतनिर्मित आरसीएफ कंपनी आहे. या कंपनीचे दूषित पाणी खाडीत सोडले जात आहे. त्यामुळे अनेकदा मासे मृत पावल्याची घटना घडली असल्याचे मच्छिमारांनी सांगितले. येथील कोळी समाजाचा मासेमारी हा प्रमुख व्यवसाय असून, यातून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत आहेत. परंतु, सोमवारी सकाळी अचानक मच्छिमारांना खाडीलगत खेकडा व अन्य मासळी मृत अवस्थेत आढळून आली.

कंपनीने दूषित पाणी सोडल्याने मासे मृत झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. याबाबत कंपनी प्रशासनाशी संपर्क साधला असता, खाडीतील मासे मृत्युमुखी झाल्याची माहिती मिळाल्यावर संबंधित विभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. मासे कशामुळे मृत झाले याचे कारण स्पष्ट झाले नाही. परंतु, पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले आहेत. त्यानंतर मासे कशामुळे मृत झाले हे स्पष्ट होईल, असे त्यांनी सांगितले.

Web Title: various species of fish including crabs die due to contaminated water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :alibaugअलिबाग