रोहा : तालुक्यातील पंचायत समितीच्या सभापतीपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी-शेकाप आघाडीच्या उमेदवार वीणा चितळकर या ५ मते मिळवून विजयी झाल्या आहेत. त्यांच्या प्रतिस्पर्धी चेतना लोखंडे यांना ३ मते पडली. चितळकर यांनी जातीच्या दाव्याच्या पुष्ट्यर्थ सादर केलेल्या पावतीमध्ये सेवा असा उल्लेख असल्याने सेनेच्या उमेदवार चेतना लोखंडे यांनी लेखी हरकत नोंदविली होती. परंतु निवडणूक निर्णय अधिकारी यांनी सदरचा हरकत अर्ज निकाली काढला. रोहा पंचायत समितीच्या उपसभापतीपदी विजया पाशिलकर यांची निवड करण्यात आली आहे.शिवसेनेच्या सभापतीपदाच्या उमेदवार लोखंडे यांनी चितळकर या कोणत्याही सेवेत नसून जात पडताळणीसाठी दाखल करण्यात आलेल्या प्रकरणात खोटा व दिशाभूल करणारा उल्लेख करून सेवेसाठी जात पडताळणी प्रकरण दाखल केले आहे. निवडणूक कामासाठी सदर प्रकरण दाखल केलेले नाही. या मुद्द्यावरून हरकत घेत उमेदवारी अर्ज रद्द करावा, अशी मागणी केली होती, पण पीठासन अधिकारी यांनी हरकत फेटाळून लावली. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या या निकालाविरोधात न्यायालयात दाद मागणार असल्याची माहिती शिवसेनेचे नेते नितीन तेंडुलकर यांनी दिली आहे.म्हसळा : म्हसळा पंचायत समितीच्या सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आंबेत गणातील उमेदवार उज्ज्वला शरद सावंत यांची बिनविरोध निवड झाल्याचे पीठासीन अधिकारी वीरसिंग वसावे आणि गटविकास अधिकारी नीलम गाडे यांनी घोषित केले. चार पंचायत समिती सदस्यांमध्ये चारही सदस्य हे राष्ट्रवादी काँग्रेसचे असल्यामुळे शांत वातावरणात निवड कार्यक्र म पार पडला.
रोह्याच्या सभापतीपदी वीणा चितळकर
By admin | Published: March 15, 2017 2:35 AM