शहरं
Join us  
Trending Stories
1
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
2
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
3
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
4
भयंकर! नर्सने माचिसची काडी पेटवली अन् आग लागली; वॉर्डमध्ये नेमकं काय घडलं?
5
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
6
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
7
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
8
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
9
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
10
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
11
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
12
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
13
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
14
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
15
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
16
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
17
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
18
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
19
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
20
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक

वाहन कायद्याचे होतेय महामार्गावर उल्लंघन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2019 12:56 AM

गेल्या आठ महिन्यांत वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या ५,८५७ वाहनांवर कारवाई करत १२ लाख ३२ हजार ४०० रुपये दंड वसुली केला आहे.

सिकंदर अनवारेदासगाव : महामार्ग वाहतूक पोलीस शाखा महाड यांनी गेल्या आठ महिन्यांत वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या ५,८५७ वाहनांवर कारवाई करत १२ लाख ३२ हजार ४०० रुपये दंड वसुली केला आहे. बुधवारी महामार्गावर मोठ्या संख्येने अनेक वाहनचालक मोटार वाहन कायद्याचे मोठ्या प्रमाणात उल्लंघन करत आहेत. सध्या केंद्र सरकारने जुन्या कायद्यामध्ये बदल करत दंडाच्या रकमेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ केली असली तरी सध्या तरी हा कायदा महाराष्टÑामध्ये अंमलबजावणीत आलेला नाही. असता तर हीच दंडाची रक्कम कोट्यवधीच्या घरात गेली असती.गेल्या वर्षभरापासून संपूर्ण राज्यात वरिष्ठ पोलीस प्रशासनाच्या आदेशानुसार वाहन कायद्याच्या नियमांचे उल्लंघन करणाºया वाहनचालकांवर लगाम लावण्याचे काम ठिकठिकाणच्या खालच्या पातळीच्या अधिकाऱ्यांनी सुरू केले आहे. मोटार वाहन कायद्याची मोठ्या प्रमाणात पायमल्ली केली जात असून कमी दंड असल्याने याकडे वाहनचालकांकडून दुर्लक्ष केले जात असल्याचे लक्षात येताच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नियम मोडणाºयांना लगाम घालण्यासाठी कडक कायदा करत, काही नियम तोडलात तर शिक्षा आणि काही नियम मोडणाºयांना मोठ्या रकमेचा दंडाचा बडगा उगारला आहे. कायदा संपूर्ण देशात लागू झाला असला तरी काही राज्यांनी या कायद्याच्या अंमलबजावणीस नकार दिला आहे. त्यामध्ये महाराष्टÑ देखील आहे.मुंबई -गोवा राष्टÑीय महामार्गावरून दर दिवशी शेकडो वाहनांची वर्दळ आहे. वाहतुकीस अडथळे दूर करण्यासाठी तसेच वाहतुकीचे नियम मोडत कायद्याचे उल्लंघन करणाºया वाहनचालकांवर नजर ठेवण्यासाठी मुंबई -गोवा राष्टÑीय महामार्गावर अनेक ठिकाणी वाहतूक शाखा पोलीस चौक्या उभारण्यात आलेल्या आहेत. सध्या या पोलीस शाखांवर दर दिवशी शेकडो वाहनांना थांबवले जात असून वाहनांची तपासणी करत कागदपत्रांची देखील तपासणी केली जात आहे, तर वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाºया वाहनचालकांवर कारवाई देखील केली जात आहे.या कारवाईमध्ये सध्या तरी कोकणातील महामार्ग वाहतूक पोलीस शाखा महाड यांनी गेल्या आठ महिन्यांत मोटार वाहन कायद्याच्या नियमांचे उल्लंघन करणाºया वाहनचालकांवर दंडाची कारवाई करत मोठ्या प्रमाणात दंड वसूल केलाआहे.महामार्ग वाहतूक पोलीस शाखा महाड या ठिकाणी काही दिवसापूर्वीच नवीन पोलीस उपनिरीक्षक वाय. एम. गायकवाड यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. या शाखेमध्ये हजर झाल्यानंतर यांनी महामार्गावर मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणाºया वाहनचालकांवर लगाम घालण्यास सुरुवात केली. यामुळे नियम धाब्यावर बसवणाºया वाहनचालकांमध्ये या अधिकाºयांबद्दल एक दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.>जुन्या कायद्याप्रमाणेच वसुलीसध्या संपूर्ण भारतात नवीन मोटार वाहन कायदा लागू झाला असला तरी महाराष्टÑ सरकारने याची अद्याप अंमलबजावणी केलेली नसल्याने सध्या वसूल करण्यात आलेली दंडाची रक्कम ही जुन्या कायद्याप्रमाणेच केली गेली आहे. जुन्या नियमानुसार हेल्मेट न घालणे ५०० रुपये, वाहनाचा इन्शुरन्स नसणे २५०० आणि रिफ्लेक्टर पट्टी न लावणे १००० रुपये या व्यतिरिक्त इतर नियमांचे उल्लंघन झाल्यास सर्वांना २०० रुपये दंड आकारला जातो. नवीन कायद्यानुसार दंड आकारणी करण्यात आली तर या दंडाच्या रकमेचा आकडा कोट्यवधीच्या घरात पोहोचला असता.>या नियमांचे उल्लंघनजानेवारी ते आॅगस्ट या आठ महिन्यांत महामार्ग वाहतूक पोलीस शाखा महाड यांनी सीटबेल्ट न लावणे, हेल्मेट न घालणे, गाडीचा इन्शुरन्स नसणे, पीयूसी, वाहन चालवताना मोबाइलवर बोलणे, काचांवर काळी फिल्म बसवणे, रहदारीत अडथळा निर्माण करणे, बॅच जवळ न बाळगणे, विना लायसन वाहन चालवणे आणि मोठ्या वाहनांवर रिफ्लेक्टर पट्टी न लावणे अशा नियमांचे उल्लंघन करणाºया ५,८५७ वाहनांवर कारवाई करत १२ लाख ३२ हजार ४०० रु.दंड वसूल केला.>वाहनचालकांनी सुरक्षा नियमांचे पालन करावे. जेणेकरून आपला परिवार, आपण सुरक्षित राहू.- वाय. एम. गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक, महामार्ग वाहतूक शाखा महाड