पाली : सुधागडात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी-शेकाप यांची आघाडी निश्चित झाली असून समान जागांवर निवडणुका लढविण्याचे अंतिम झाल्याची घोषणा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष वसंतराव ओसवाल यांनी केली. ओसवाल यांच्या हस्ते जांभूळपाडा येथील सिध्दलक्ष्मी गणपती मंदिरात राष्ट्रवादी-शेकाप आघाडीच्या प्रचाराचे श्रीफळ वाढून प्रचारास जांभूळपाडा विभागातून मोठ्या उत्साहात (२४) जानेवारीला सुरु वात करण्यात आली.या प्रसंगी बोलताना ते म्हणाले की, सुधागड तालुक्यातील खेड्यापाड्यात व आदिवासी वाड्यांवर मूलभूत सोयी-सुविधा व तेथील परिपूर्ण विकासकामे ही राष्ट्रवादी-शेकाप या आघाडीनेच मोठ्या प्रमाणात केलेली असल्याने या विकासकामांच्या जोरावरच सुधागडातील जनता आम्हाला विजयी करणार असा ठाम विश्वास ओसवाल यांनी व्यक्त केला .या प्रचार दौऱ्यात ओसवाल यांच्या जोडीला शेकापचे ज्येष्ठ नेते जे.बी. गोळे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष पालवे ,सरचिटणीस ग.रा. म्हात्रे, उपसभापती रमेश साळुंखे, माजी सभापती भारती शेळके, परळी गटाच्या जि.प. उमेदवार गीताताई पालरेचा, जांभूळपाडा पं.स. गणाचे उमेदवार जयवंत (आबा) बहाडकर आदी उपस्थित होते.(वार्ताहर)
विकासकामांच्या जोरावरच विजय निश्चित - ओसवाल
By admin | Published: January 26, 2017 3:23 AM