रायगड जिल्ह्यात दक्षतेचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2017 02:27 AM2017-12-05T02:27:38+5:302017-12-05T02:27:45+5:30
रायगड जिल्ह्यातील समुद्र, खाडी किनाºयावरील गावांना ‘ओखी’ चक्रीवादळाचा तडाखा बसण्याची शक्यता लक्षात घेऊन सावधानतेचा इशारा रायगड जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून दिला आहे.
अलिबाग : रायगड जिल्ह्यातील समुद्र, खाडी किनाºयावरील गावांना ‘ओखी’ चक्रीवादळाचा तडाखा बसण्याची शक्यता लक्षात घेऊन सावधानतेचा इशारा रायगड जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून दिला आहे. सुरक्षिततेची उपाययोजना म्हणून जिल्ह्यातील शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केल्याची माहिती रायगडचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती नियंत्रण यंत्रणेचे प्रमुख डॉ.विजय सूर्यवंशी यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली आहे.
पुढील ४८ तासात वादळी वाºयाचा वेग ६० ते ७० किमी प्रति तास राहणार असून समुद्र खवळलेला असणार आहे. त्यामुळे पुढील सूचना मिळेपर्यंत मच्छीमारांनी समुद्रात प्रवेश करु नये. तसेच जे मच्छीमार समुद्रात गेले आहेत त्यांनी तत्काळ सुरक्षित बंदरावर आसरा घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. मंगळवारी मध्यरात्री १ वाजता ५.०१ मीटर उंचीची समुद्रास भरती असणार आहे. त्यामुळे सखल व किनाºयालगतच्या भागातील नागरिकांनी दक्षता घ्यावी.
किनारी भागातील नागरिकांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. वादळाबाबत कोणत्याही प्रकारच्या अफवा पसरवू नयेत, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे.
आपत्कालीन परिस्थितीत संबंधित तहसीलदार कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियंत्रण कक्षास ०२१४१ २२२११८ / २२२०९७ / २२७४५२ तसेच टोल फ्री नंबर १०७७ येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्षाच्या सूत्रांनी के लेआहे.