वाकू्रळवर महिलाराज

By admin | Published: October 14, 2015 02:57 AM2015-10-14T02:57:15+5:302015-10-14T02:57:15+5:30

महिलाशक्तीची नवरात्रीत पूजा होत असताना घटस्थापनेचा शुभ मुहूर्त साधीत ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत मंगळवारी ग्रुप ग्रामपंचायत वाक्रूळच्या ११ जागांसाठी

Vihiral Mahalaraja | वाकू्रळवर महिलाराज

वाकू्रळवर महिलाराज

Next

पेण : महिलाशक्तीची नवरात्रीत पूजा होत असताना घटस्थापनेचा शुभ मुहूर्त साधीत ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत मंगळवारी ग्रुप ग्रामपंचायत वाक्रूळच्या ११ जागांसाठी ११ महिला उमेदवारांनी शेवटच्या दिवशी निवडणूक अधिकाऱ्यांकडे अर्ज सादर केले. यामुळे ही निवडणूक बिनविरोध झाली आहे.
पंचक्रोशीतील महिलांनी गावाच्या विकासासाठी नवरात्रोत्सवाच्या शुभारंभी चांगला निर्णय घेत ११ महिला उमेदवाराचे अर्ज सादर केले. पेणमध्ये प्रथमच वाक्रूळ ग्रामपंचायतीवर महिलांचे राज्य अवतरणार आहे. शेकापच्या माजी जिल्हा परिषद अध्यक्ष व विद्यमान सदस्या अ‍ॅड. नीलिमा पाटील यांच्या नेतृत्वाखाली वाक्रूळ ग्रामपंचायतीचा पुढील पाच वर्षे शेकापच्या ११ भगिनी एकहाती राज्यकारभार करणार असल्याने वाक्रूळ ग्रामपंचायत शासनाच्या बक्षिसास पात्र ठरणार आहे.
पंचायतराज संस्थांमध्ये ५० टक्के महिला आरक्षणामुळे सहा महिलांचा बोलबाला सुरू आहे. वाक्रूळ ग्रामस्थांनी आ. धैर्यशील पाटील, पंचायत समितीचे माजी सभापती व विद्यमान सदस्य महादेव दिवेकर व खरेदी-विक्री संघाचे चेअरमन बापू दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत ११ जागा ११ महिलांचे उमेदवारी अर्ज भरण्याचा महत्वाकांक्षी निर्णय घेण्यात आला. ग्रामस्थांनी त्यास एकमताने संमती दिल्यावर अ‍ॅड. नीलिमा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उमेदवारी अर्ज भरण्यात आले. मंगळवारी निवडणूक अर्ज भरण्याच्या अंतिम दिवशी सार्वत्रिक निवडणूक असलेल्या आंबेघर ९ जागा २० अर्ज, खारपाले ११ जागा ४७ अर्ज, जोहे ११ जागा २५ अर्ज, कामार्ली ११ जागा २७ अर्ज, वाक्रूळ ११ जागा ११ अर्ज. वाक्रूळ बिनविरोध ग्रामपंचायत वगळता ४ सार्वत्रिक निवडणूक होत असलेल्या ग्रामपंचायतींच्या ४२ जागांसाठी १०८ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.
पोटनिवडणूक जाहीर झालेल्या ग्रामपंचायतींमध्ये वरप २ जागा २ अर्ज, वरसई १ जागा १ अर्ज, आंबिवली १ जागा ० अर्ज, बेलवडे ३ जागा ० अर्ज अशाप्रकारे चार ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीसाठी तीन अर्ज दाखल झाले आहेत. (वार्ताहर)

Web Title: Vihiral Mahalaraja

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.