शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha: आतापर्यंत कोणत्या पक्षाचा स्ट्राइक रेट राहिला सर्वाधिक?
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कामात यशस्वी व्हाल, आर्थिक लाभ होण्याची शक्यता!
3
निवडणुकीत डिपॉझिट वाचवण्यासाठी उमेदवारांना किती मतांची गरज असते?; जाणून घ्या सविस्तर
4
IND vs AUS : बुमराहच्या नेतृत्वाखाली या दोन नव्या चेहऱ्यांना मिळाली पदार्पणाची संधी
5
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘एक्झिट पोल’ इतके गोंधळलेले का आहेत?
6
‘ती’ वादग्रस्त विधाने आयोगाच्या रडारवर; केंद्रीय मुख्य आयुक्तांनी मागवले अहवाल
7
सत्ता आमचीच! सत्ताधारी महायुती आणि विरोधी मविआच्या नेत्यांचे दावे 
8
करवीर ते कुलाबा 40 टक्के मतांचे अंतर; असे का ते समजून घ्या!
9
टक्क्याचा धक्का कुणाला? निवडणुकीत मतदारांमध्ये सुप्त लाट
10
बीड जिल्ह्यात मतदान केंद्र फोडले; ४० जणांवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल
11
Maharashtra Vidhan Sabha ELection 2024: मुंबईत कोणत्या शिवसेनेसाठी मतटक्का वाढला?
12
विशेष लेख: कट्टर उजवे आणि वादग्रस्त - ऑल द प्रेसिडेंट्स मेन....
13
अदानींवर अमेरिकेत लाचप्रकरणी खटला; आरोप निराधार, आम्ही निर्दोष : अदानी
14
सत्ता स्थापनेच्या संभाव्य शक्यतांवर खलबते सुरू; निवडून येऊ शकणाऱ्या अपक्षांबाबतही चर्चा
15
स्ट्राँग रूमवर तिसऱ्या डोळ्याचे लक्ष; मुंबई, ठाणे, रायगड, पालघरमध्ये मतदानयंत्रे कडेकोट बंदोबस्तात
16
शिवाजी महाराज पुतळा दुर्घटना: जयदेव आपटेंच्या याचिकेवरील सुनावणी तहकूब
17
बारावी ११ फेब्रुवारी, दहावी परीक्षा २१ फेब्रुवारीपासून; व्हायरल वेळापत्रकावर विश्वास न ठेवण्याचे बोर्डाचे आवाहन
18
यूजीसी नेट परीक्षा जानेवारीत होणार; १० डिसेंबरपर्यंत अर्ज भरता येणार
19
Exit Poll: दोन्ही NCP तुल्यबल; एकनाथ शिंदेच ठरणार वरचढ, उद्धव ठाकरेंना किती जागा मिळणार?
20
१०७ जागांसह भाजपा सर्वांत मोठा पक्ष, महाविकास आघाडीला १०२ जागा; नवीन Exit Pollचा अंदाज

गावठी शेंगा वधारल्या, बाजारात जोरदार विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 09, 2021 1:45 AM

वाल, मूग, चवळीला मागणी

- गिरीश गोरेगावकरमाणगाव : लांबलेला व अवकाळी पाऊस यामुळे रब्बी हंगामातील विविध कडधान्य तयार होण्यास उशीर झाला आहे. वाल, चवळी, मुगाच्या शेंगांना तालुक्यात चांगली मागणी असून, पंधरा ते वीस दिवस उशिराने बाजारात दाखल झालेल्या वाल, मूग, चवळी इत्यादी शेंगाची विक्री बाजारात जोरदारपणे होत आहे.तालुक्‍यात रब्बी हंगामात वाल, मूग, चवळी इत्यादी कडधान्याची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. मात्र, गेले दोन ते चार दिवसांत तालुक्यातील विविध शहरांतून तयार झालेल्या शेंगा विक्रीसाठी येत असून, यातून महिलांना रोजगार मिळत आहे. अत्यंत चवदार असलेल्या या शेंगा शिजवून व भाजून पोपटी लावून खाण्यासाठी अनेक ग्राहक खरेदी करतात. वालाच्या शेंगांना विशेष मागणी असून, गेल्या वर्षी ८० ते १०० रुपये प्रतिकिलोने मिळणाऱ्या वालाच्या शेंगा या वर्षी महाग झाल्या असून, १०० ते १२० रुपये प्रति किलोने विकल्या जात आहेत.पोपटीसाठी वालाच्या शेंगांना मागणी आहेवाल तयार झाला नसल्याने अनेक पोपटीप्रिय ग्राहक घाटमाथ्यावरून येणारा पावटा पोपटीसाठी उपयोगात आणत होते. बाजारात गावठी वालाच्या शेंगा उपलब्ध झाल्याने, खवय्यांनी गावठी शेंगांना पसंती देण्यास सुरुवात केली आहे.या वर्षी वाल, मूग, चवळीच्या शेंगा तयार होण्यास उशीर झाला. आता मात्र, शेंगा तयार झाल्या असून, अजून चार ते पाच दिवसांनी मोठ्या प्रमाणात मिळतील. या वर्षी पाऊस लांबल्याने कडधान्य शेंगा तयार होण्यास उशीर झाला.- सीता काटकर, शेंगा विक्रेतागावठी वालाच्या शेंगा अतिशय चवदार असतात. या वर्षी अवकाळीने या शेंगा उशिराने विक्रीसाठी आल्या आहेत. मात्र, पोपटीसाठी व शिजवून खाण्यासाठी या शेंगा अतिशय चवदार आहेत. त्यामुळे यांना मोठी मागणी आहे.- सुमित मोंडे, मुंबईकर चाकरमानीशेंगांचे बाजारातील दरशेंगा     मागील वर्षी    यावर्षीवाल     ८० ते १००     १०० ते १२०मूग     ५० ते ६०    ७० ते ८०चवळी     ४० ते ५०    ६० ते ८०(दर रुपयांमध्ये)